
मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झालं. 9 पैकी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवक फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ठाकरे गटाचे एकूण 20 आमदार आहेत. यातील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगरचा पुढचा अंक सुरु झालाय असही राजकीय वर्तुळात बोललं जातय. त्यावर आता मंत्री उदय सामंत बोलले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली का? या प्रश्नावर उदय सामंत बोलले. “ऑपरेशन नंबर 1,2,3 याच्यापेक्षा दररोज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश मुंबईत सुरु आहेत. जर प्रत्येक ऑपरेशनला नंबर द्यायला गेलात तर 365 दिवस नंबर द्यावे लागतील. परंतु जर महाविकास आघाडीच्या आमदारांची इच्छा असेल एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं, तर आम्ही त्यांना का नाकारवं. त्यांना पक्षात येऊ नका असं का सांगावं. महाराष्ट्रातील लोकप्रितिनिधींमध्ये हे वातावरण तयार झालं आहे” असं उदय सामंत बोलले.
तर त्याचा सर्वात जास्त आनंद मला होईल
विजय वडेट्टीवार शिवसेनेत प्रवेश करणार का? त्या संदर्भात काय चर्चा सुरु आहेत? यावरही उदय सामंत बोलले. “विजय वडेट्टीवार चांगले मित्र आहेत. शिंदे साहेबांचे जवळचे मित्र आहेत. विजय वडेट्टीवार यांनी पक्ष प्रवेशासंदर्भात आमच्याशी कधी चर्चा केली नाही. त्यांच्यासारखा विदर्भातला ताकदीचा नेता माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करणार असेल तर त्याचा सर्वात जास्त आनंद मला होईल. मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासारखा चांगला, लोकशाहीशी चांगला नाळ जोडलेला नेता आला, तर कोणाला नकोय”
त्यांच्या पक्ष प्रवेशासंबंधी काही घडामोडी सुरु आहेत का?
त्यांच्या पक्ष प्रवेशासंबंधी काही घडामोडी सुरु आहेत का? या संदर्भातील घडामोडींची मला कल्पना नाही. “मुंबईत घडामोडी सुरु असताना कदाचित मी विदर्भात असेन. सध्या कुठलही ऑपरेशन सुरु नाहीय. पण मविआतील नेतेमंडळी शिवसेनेत येणार असेल तर त्यांचं स्वागत करु”
Leave a Reply