• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूचं नेमकं सत्य काय? महिला खासदार म्हणते, ‘वाचवायला कोणी येत नाही म्हणून…’

May 21, 2026 by admin Leave a Comment


Twisha Sharma Death Case: सध्या सर्वत्र फक्त ट्विशा शर्मा आणि दीपिका नागर केसची चर्चा सुरु आहे. दोन्ही महिलांच्या मृत्यूने सर्वांना हैराण केलं आहे. ट्विशा आणि दीपिका यांच्या मृत्यूबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामध्ये आता सेलिब्रिटी देखील बोलू लागले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी याप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे… ज्याप्रकारे देशातील महिला शारीरिक आणि मानसिक त्रासा कंटाळून मृत्यूला जवळ करत आहेत, त्यावर कंगना यांनी हैराणी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत कंगना यांनी मोठं सत्य समोर आणलं आहे.

कंगना राणौत यांनी महिलांना लग्न फार विचार करुन करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय महिलांनी आत्मनिर्भर व्हावं असं देखील सांगितलं आहे. पोस्ट करत कंगना म्हणाल्या, ‘दररोद तरुण विवाहित महिलांबद्दल वाईट बातमी समोर येत आहे… उच्च शिक्षित महिला संकंट येण्यापूर्वी आई – वडिलांकडे मदतीसाठी विनंती करतात. पण भारतीय समान लग्नानंतर मुलींकडे लक्ष देत नाही…’

‘तरुण महिसांसाठी माझा एक सल्ला आहे, कोणत्याच प्रकारचा सोशल मीडिया किंवा फॅशन, डेटिंग, लग्न, मेकअप इंडस्ट्री तुम्हाला सांगणार नाही. तुमचं करियर सर्वात जास्त महत्त्वाचं आहे… आत्मनिर्भर झाल्यानंतरच लग्नाचा विचार करा. एक लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःला आता तुमचा हिरो बनवा लगणार आहे… तुम्हाला वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही. त्यामुळे लग्न कोणासोबत केलं पाहिजे याचा देखील विचार करा. तुम्हाला हवं तसं तुमचं आयुष्य बनवा… बाकी कुणाचंच ऐकू नका…’, असा सल्ला कंगना यांनी महिलांना दिला आहे.

ट्विशा शर्मा डेथ केस…

नोएडा येथील 31 वर्षीय गर्भवती ट्विशा शर्मा हिने भोपाळ येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं. ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, लग्नानंतर ती मानसिक आणि भावनिक त्रासाने ग्रस्त होती. या प्रकरणाबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही आत्महत्या चिठ्ठी सापडली नाही आणि तपास सुरू आहे.

दीपिका नागर डेथ केस

ग्रेटर नोएडातील आणखी एका घटनेत, हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या आरोपानंतर 24 वर्षीय विवाहित महिला दीपिका नागरने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दीपिकाचा हुंड्यासाठी सतत छळ केला जात होता आणि तिला मारहाणही केली जात होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी देखील पोलीस अधिक चौकशी करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in