• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TSC प्रकरणात मोठा ट्विस्ट! निदा खानच्या बाजूने थेट एक कमिटी मैदानात, नेमकं काय घडलं?

May 25, 2026 by admin Leave a Comment


टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणीवरील बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या समर्थनार्थ आता ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ पुढे आली असून, दुसरीकडे फरार आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी अडकलेले ‘एमआयएम’चे (MIM) नगरसेवक मतीन पटेल आज नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे.

माजी आमदाराचा पोलिसांच्या तपासावर सवाल

इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. मुख्य संशयित निदा खानसह ७ आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘खरात प्रकरण’ दाबण्यासाठीच हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आले असून, टीसीएस (TCS) प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा शेख यांनी केला आहे. निदा खान यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी आपण स्वतः हजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सॲप चॅटमधून धक्कादायक खुलासे

पोलीस तपासात संशयित निदा एजाज खान हिने तिच्या एका नातेवाईकासोबत केलेल्या व्हॉट्सॲप चॅटिंगमधून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयितांनी रचलेल्या कटानुसार पीडित तरुणीचे वर्तन सुरू झाल्यावर, तिचे नाव बदलून ‘हानिया’ असे ठेवण्यात आल्याचे या चॅटिंगवरून निष्पन्न झाले आहे. या पुराव्यांमुळे पोलिसांच्या तपासाला मोठी गती मिळाली आहे.

नगरसेवक मतीन पटेल आज शरण येणार?

याच गुन्ह्यात निदा खान फरार असताना तिला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना सहसंशयित करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी नाशिक गुन्हे शाखेचे पथक पटेल यांच्या शोधार्थ संभाजीनगरमध्ये गेले होते, मात्र ते हाती लागले नव्हते. आता या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पटेल यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळताच पटेल यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, ते आज (सोमवारी) नाशिक शहर पोलिसांना शरण येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. बजावलेल्या नोटिशीप्रमाणे मतीन पटेल आज हजर राहणार का, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागून आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in