• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला सुपर ओव्हरमध्ये नमवलं, शेवटच्या चेंडूवर असा रंगला ड्रामा

June 15, 2026 by admin Leave a Comment

ट्राय नेशन ए सिरीज स्पर्धेत भारत अ आणि श्रीलंक अ सामन्यात बराच ड्रामा घडला. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर नाणेफेक जिंकून तिलक वर्मा प्रथम गोलंदाजी करणार होता. पण वाटेला फलंदाजी आली आणि टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाला. विपरज निगम आणि सूर्यांश शेंडगे यांच्या खेळीमळे टीम इंडियाला 265 धावांपर्यंत मजल मारता आली आणि विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं. पण विपरज निगमने केलेल्या चुकीमुळे भारताला 10 धावांचा फटका बसला आणि श्रीलंकेची सुरूवात विना बाद 10 धावांनी झाली. खेळपट्टीच्या मधून धावल्याने पंचांनी 10 धावांची पेनल्टी लावली होती. त्यामुळे हा सामना रंगतदार झाला. एक तर अधीच खात्यात 10 धावा होता आणि श्रीलंकेने त्यात शेवटचा चेंडू खेळून 255 धावा जोडल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. आता निकालासाठी सुपर ओव्हर करावी अशी विनवणी करण्यात आली. त्यानंतर पंचांनी सल्लामसलत करून सुपर ओव्हरचा निर्णय घेतला.

सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर काय घडलं?

सुपर ओव्हरमध्ये पहिली फलंदाजी श्रीलंकेच्या वाटेला आली. भारताकडून अर्शद खानने षटक टाकलं. पहिल्याच चेंडूवर सहान अराचिगेने 2 धावा काढल्या. त्यानंतर वाइड टाकला आणि परत दुसरा चेंडू टाकल्यानंतर 1 धावा काढली आणि अविष्का फर्नांडोला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर अविष्काने एक धाव काढली आणि सहान स्ट्राईकला आला. त्याने चौथ्या चेंडूवर तीन धावा काढल्या आणि अविष्का स्ट्राईकला आला. अविष्काने पाचव्या चेंडूवर षटकार मारला. सहाव्या चेंडू फुल टॉस टाकला आणि एक धाव काढली. या चेंडूवर नाट्यमय घडामोड घडली. वैभव सूर्यवंशी फलंदाजीसाठी तयार होण्याकरिता आधीच मागे गेला होता. भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जात होते आणि सर्वांना परत बोलावण्यात आले. पण पंचांनी नो बॉल दिल्याने परत यावं लागलं. अंधार पडत असल्याने तिलक वर्माचा संताप झाला. सहावा चेंडू परत टाकल्यानंतर 1 धाव आली. यासह श्रीलंकेने 16 धावा केल्या आणि विजयासाठी 17 धावांचं आव्हान दिलं.

भारताकडून हे आव्हान गाठण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेंडगे मैदानात उतरले. सूर्यांशने स्ट्राईक घेतली. पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव काढून वैभव सूर्यवंशीला स्ट्राईक दिली. वैभवने चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर त्याने चौकार मारला. त्यामुळे 1 चेंडूत 8 धावा अशी स्थिती आली. शेवटच्या चेंडूवर वैभव धाव काढता आली नाही. त्यामुळे भारताने सुपर ओव्हरमध्ये हा सामना 7 धावांनी गमावला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in