• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर आणि…

June 15, 2026 by admin Leave a Comment

ट्राय नेशन ए सिरीज 2026 स्पर्धेत तीन संघात अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी लढत सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात या स्पर्धेतील सातवा आणि संघांचा तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्व गडी गडी गमवून 265 धावा केल्या आणि विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं. पण या सामन्यात विपरज निगमने केलेल्या चुकीमुळे 10 धावांचं नुकसान झालं आणि फुकटच्या 10 धावा श्रीलंकेला मिळाल्या. खेळपट्टीच्या मधून धावल्याने पंचांनी 10 धावांची पेनल्टी दिली. त्यामुळे श्रीलंकेची सुरूवात विना बाद 10 धावांनी झाली. त्यात हा सामना शेवटच्या षटकात बॉल टू बॉल आला होता. त्यामुळे धाव किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येत होता. अखेर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारताने हा सामना गमावला. भारताला सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ 9 धावा करू शकला आणि 7 धावांनी सामना गमावला.

भारतासाठी करो या मरोची लढाई

भारताचा चौथा आणि शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई ठरणार आहे. श्रीलंकेने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं तर भारताला अंतिम फेरीची सहज संधी मिळेल. म्हणजेच भारताला अफगाणिस्तानला काहीही करून पराभूत करावं लागेल. त्यानंतर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. पण अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत केलं तर मात्र जर तर वर येईल. भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकवा तर लागेलच. वरून नेट रनरेटचं गणित सोडवावं लागेल. कारण या स्थितीत तिन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील. त्यामुळे अंतिम फेरीचं तिकीट नेट रनरेटच्या आधारावर ठरेल.श्रीलंकेचे 4 गुण आणि नेट रनरेट हा +0.494 आहे. तर भारताचे 2 गुण असून नेट रनरेट +0.032, तर अफगाणिस्ताने 2 गुण आणि नेट रनरेट हा -1.392 आहे.

भारताचा चौथा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 17 जून रोजी होणार आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकवाच लागणार आहे. अन्यथा या स्पर्धेतून आऊट होईल. भारताने हा सामना जिंकल्यानंतर श्रीलंका अफगाणिस्तान सामन्यावर लक्ष ठेवावं लागेल. हा सामना 19 जूनला होणार आहे. हा सामना श्रीलंकेने जिंकला तर भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. पण अफगाणिस्तानने जिंकला तर मात्र सर्व गणित नेट रनरेटवर येईल. त्यामुळे या दोन्ही सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. अंतिम फेरीचा सामना 21 जून रोजी होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in