• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tom Cruise: या बॉलिवूड अभिनेत्रीवर टॉम क्रूज फिदा? ती आहे तरी कोण?

August 12, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून रिअॅलिटी शोची क्रेझ प्रचंड वाढली आहे. सध्या ‘द ट्रेटर्स’ या शोचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा शो प्रदर्शित होण्यापूर्वीच शोमधील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मोठा दावा केला आहे. तिने थेट हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज तिच्यावर फिदा असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने जर मोबाईल तिच्याकडे असता तर दाखवले असते असे देखील म्हटले आहे.

ती अभिनेत्री कोण?

रियलिटी शो ‘द ट्रेटर्स’ सीझन २ ची सुरुवात १३ ऑगस्ट २०२६ पासून होत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. तसेच सीझन २ अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरच येणार आहे. आता शोच्या अनेक नवीन क्लिप्स आणि माहिती लीक झाली आहे. असे म्हटले जात आहे की मुनव्वर फारुकी आधीच शोबाहेर पडला आहे. या सगळ्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेत्री बोलताना दिसते की, “नाही, सगळ्यांना माझ्यावरच क्रश येते. टॉम क्रूजला देखील आजकाल माझ्यावर क्रश आले.”

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मल्लिका शेरावतही करण जोहरचा शो ‘द ट्रेटर्स सीझन २’मध्ये सहभागी होत आहेत. या रियलिटी शोची एक क्लिप वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये कॉमेडियन आदित्य कुलश्रेष्ठ उर्फ कुल्लू मल्लिकाला विचारतात, “मल्लिका जी, तुम्हाला कधी कुणावर क्रश आला आहे का?” ज्यावर अभिनेत्रीचे उत्तर ऐकून सगळेच चकीत झाले आणि तिने मेसेज दाखवण्याबाबतही म्हटले आहे.

अभिनेत्रीलाही आवडतो टॉम क्रूज

‘द ट्रेटर्स २’च्या दुसऱ्या कंटेस्टंटला उत्तर देताना मल्लिका शेरावत म्हणते की, “नाही, सगळ्यांना माझ्यावरच क्रश येते.” नंतर त्या हे सांगून सगळ्यांना धक्का देतात की, “टॉम क्रूजला (क्रश) आजकाल माझ्यावर क्रश आले आहे” या खुलासाने सगळ्यांना धक्काच बसला. नंतर ती म्हणते, “मी खोटे बोलत नाही. माझा फोन असता तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवला असता,” ज्यामुळे असे वाटले की टॉम क्रूज त्यांना व्हिडिओ पाठवतो. तिच्या दाव्यावर एका स्पर्धकाने मजेशीर अंदाजाक विचारले की, “तो कसा व्हिडिओ पाठवत आहे?” त्यानंतर मल्लिकाने स्पष्ट केले की व्हिडिओमध्ये ते दोघे एकत्र पार्टी करताना दिसत होते. जेव्हा एका कंटेस्टंटने विचारले तेव्हा ती म्हणाली, “तो एक कूल व्यक्ती आहे, नाही का?” तेव्हा मल्लिकाने उत्तर दिले, “तो खूप शानदार आहे.”

Mallika Sherawat claiming Tom Cruise has a crush on her is next level delusion. 😭

If Tom Cruise is sending her snaps then Ryan Gosling is literally texting me right now to hang out.

The only Mission Impossible here is getting us to believe this story. 💀 pic.twitter.com/B2PxKRWv2z

— ᴅᴇᴀᴅ ᴋɪʟʟᴇʀ (@ReignOfBateman) August 11, 2026

खरं तर ‘द ट्रेटर्स २’मध्ये मल्लिका शेरावतच्या एंट्रीबाबत जितके फॅन्स एक्साइटेड आहेत, तितकी ती देखील खुश वाटत आहेत. ती एकदा याविषयी बोलताना म्हणाली की, १३ वर्षांनंतर इंडियन टेलेव्हिजनवर परत येण्याबाबत खूप उत्सुक आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in