
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज वटपौर्णिच्या सणाला सोन्याचा दरात पुन्हा घसरण झाली असल्याचे दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या…
आज वटपोर्णिमा हा सण महिला आनंदाने साजरा करत आहेत. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाले आहे .
सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात कुठलही घसरण झालेली नसून दर स्थिर आहेत.
10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपयांवर स्थिर आहेत.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply