• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: अक्षय तृतीयेच्या एक दिवसआधीच सोनं कडाडलं, सर्वसामान्यांना खरेदी करताना विचार करावा लागणार

April 18, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वात मौल्यवान असलेला धातू सोने खरेदी करणे सर्वसमान्यांसाठी कठीण झाले आहे. कारण, सोने आणि चांदीचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज, अक्षय तृतीयेच्या एक दिवसआधी सोन्याचे भाव कडाडले आहेत.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. पण यंदा सोने खरेदी करताना सर्वसामान्य लोकांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजारांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर ही आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत.

अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याने चांदीच्या दरात वाढ झाल्याने मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज, 18 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 384 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पायांवरील काळेपणा व कोरडेपणा दूर करण्यासाठी ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा अवलंब
  • Chitra Wagh : 100 टक्के बुलडोझर फिरवा, TCS प्रकरणावर चित्रा वाघ यांची रोखठोक भूमिका, अजून जर असे कोणी खरात असतील, तर…
  • IPL 2026, RCB vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला…
  • PM Narendra Modi: मोठी बातमी!आज रात्री 8.30 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश काय? महिला आरक्षण बिलावर बोलणार?
  • टू-व्हीलर मार्केटमध्ये मोठी तेजी, मार्चमध्ये 13 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री, ‘या’ 10 गाड्यांनी मारली बाजी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in