
उन्हाळा आणि पावसाळ्यात घरात झुरळांचा वावर वाढताना दिसतो. घरातील ओलसर, अंधाऱ्या आणि उबदार जागा झुरळांसाठी पोषक ठरतात. त्यामुळे स्वयंपाकघर, सिंकजवळची जागा, गॅसच्या मागील भाग किंवा कचरापेटीजवळ झुरळं दिसण्याचं प्रमाण वाढू शकतं. झुरळांच्या त्रासामुळे अनेकजण त्यांना दूर ठेवण्यासाठी विविध घरगुती उपाय करून पाहतात. त्यापैकी एक उपाय म्हणजे कापूर आणि लवंगाचा वापर. (Image Source – iStock)
सर्वप्रथम कापूर बारीक करून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर एका ग्लास कोमट पाण्यात कापूराची पावडर आणि काही लवंगा टाका. हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवावं. त्यामुळे कापूर आणि लवंगाचा सुगंध पाण्यात मिसळेल
यानंतर हे मिश्रण गाळून स्प्रेचं झाकणं असेल अशा बाटलीत भरून घ्या. रात्री स्वयंपाकघरातील सिंकजवळ, पाईपच्या आसपास, गॅसच्या शेगडीमागे, खोलीच्या कोपऱ्यांमध्ये तसेच कचरापेटीजवळ याची फवारणी करू शकता.
झुरळं ही प्रामुख्याने अंधाऱ्या आणि ओलसर ठिकाणी लपतात. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता राखण्यासोबतच हा घरगुती उपाय करून पाहता येऊ शकतो.
ज्या ठिकाणी या पाण्याची फवारणी करणं शक्य नाही, तिथे कापराच्या गोळ्या पातळ कापडात बांधून त्याची छोटीशी पोटली तयार करून ठेवू शकता. कापराच्या तीव्र वासामुळे झुरळे अशा जागेपासून दूर राहतील.
( टीप: ही माहिती उपलब्ध स्रोतांवरून घेण्यात आली आहे. हा घरगुती उपाय असल्याने त्याचा परिणाम प्रत्येक ठिकाणी सारखाच होईलच असं नाही. घरातील झुरळांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास योग्य कीटकनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे.)





Leave a Reply