• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

The Odyssey: ख्रिस्तोफर नोलनचा ‘मास्टरपीस’, डोळ्यांचं पारणं फेडणारा सिनेमॅटिक अनुभव; ऑस्कर पटकावणार?

July 17, 2026 by admin Leave a Comment


होमर नावाचा व्यक्ती कधी अस्तित्त्वात होता की नाही, यावर अद्याप वाद आहे. होमरने ‘ओडिसी’ ही महागाथा लिहिली की नाही, हे कोणी पाहिलं नाही. मात्र जगविख्यात दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘द ओडिसी’ हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मार्टिन स्कॉरसीसीचं लोकप्रिय मीम डोळ्यांसमोर येतं- दिस इज सिनेमा! प्राचीन ग्रीकच्या सर्वांत मोठ्या पौराणिक कथांपैकी एक ‘ओडिसी’ची तुलना नेहमीच भारतातील महाकाव्य ‘महाभारता’शी होते. ‘द ओडिसी’मध्ये ख्रिस्तोफर नोलन यांनी ट्रोजन वॉरनंतर ग्रीसमधील सर्वांत दमदार योद्धा ओडिसियसच्या (मॅट डेमन) घरवापसीची कथा दाखवली आहे.

एखाद्या महाकाव्याला साजेशी दृश्ये, त्या दृश्यांना एका अद्भुत अनुभवात बदलणारं संगीत आणि पात्रांमधील संवादांना तत्त्वज्ञानात रुपांतर करणारे डायलॉग्स.. या सर्वांच्या आधारावर नोलन यांनी अशी एक जादुई कथा मांडली आहे, जी तुम्हाला 2 तास 52 मिनिटं खुर्चीला खिळवून ठेवेल. ही कथा फक्त ओडिसियसची नाही, तर त्याची पत्नी पेनेलोपी (अॅन हॅथवे) हिचीसुद्धा आहे, जी दशकभरापासून तिच्या पतीच्या प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडे तिच्या महालात दररोज तिच्याशी लग्न करण्याच्या इच्छेने पुरुषांची मोठी गर्दी जमत असते. ही कहाणी ओडिसियसचा मुलगा टेलेमेकसचीही (टॉम हॉलँड) आहे, जो स्वत:ला कर्तृत्त्ववान युवराज म्हणून सिद्ध करण्यासाठी संघर्ष करतोय. परंतु त्याला त्याच्या वडिलांच्या आदर्शांवरही ताठ मानेनं उभं राहायचं आहे, ज्यांच्या जिवंत राहण्याची आता कोणतीच अपेक्षा राहिलेली नाही.

ओडिसियस परतणार का? परतला तरी तो तोच ओडिसियस असेल का, जो एका अशक्य वाटणाऱ्या विजयासाठी युद्ध लढायला गेला होता? तो परतल्यानंतर त्याचं इथाका हे राज्य तसंच राहिल का? ही कथा एका योद्ध्याच्या घरवापसीची असेल की युद्धाची आग विझल्यानंतर राख उचलणाऱ्या व्यक्तीची असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपटात मिळतील. या सर्वांपेक्षाही नोलन यांची ‘द ओडिसी’ ही त्या शेकडो शूर योद्धांची कथा आहे, जे ओडिसियससोबत त्या ट्रोजन वॉरमध्ये होते.

ओडिसियसचा परतीचा प्रवास

‘ओडिसी’ हे जणू समुद्राएवढं महाकाव्य आहे, त्यामुळे या समुद्राला नोलन त्यांच्या चित्रपटात कशा पद्धतीने मांडू शकतील, त्यात त्यांना यश मिळेल की नाही, अशी अनेकांना शंका होती. परंतु नोलन यांनी इथे ट्रोजन वॉरला केंद्रस्थानी ठेवलंच नाही. त्यामुळे ‘द ओडिसी’मध्ये नोलन यांच्या स्टाइलमध्ये युद्ध पाहण्याची अपेक्षा करणाऱ्यांची थोडीफार निराशा होऊ शकतो. इथे नोलन यांचा संपूर्ण फोकस हे ओडिसियसच्या घरवापसीच्या प्रवासावर आणि त्या प्रवासात मिळालेल्या अनुभवांवर आहे.

ओडिसियससाठी हा अनुभव एखाद्या नव्या चष्म्याप्रमाणे ठरतो, ज्याद्वारे जो आयुष्य आणि माणसांमधील माणुसकीची पारख करू लागतो. या मार्गात त्याच्या सैन्याच्या तुकडीचा सामना एक राक्षस, विशालकाय मानव, मायावी जादूगार आणि खवळलेल्या भयानक समुद्राशी होतो. हा संपूर्ण प्रवास पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत भव्यदिव्य सिनेमॅटिक अनुभव ठरतो. ‘द ओडिसी’च्या स्क्रिनप्लेबद्दल बोलायचं झाल्यास, कथा सुरुवातीला धीम्या गतीने पुढे जाऊ लागते, मात्र त्यात कुठेही कंटाळवाणं वाटत नाही. एकेका भूमिकेचे आणि कथेचे पदर उलगडत असताना एखादा सीन अचानक उत्साह निर्माण करून पुढची उत्सुकता ताणून ठेवतो.

टाइम मशीनसारखी सिनेमॅटोग्राफी

प्रेम, राजकारण, सत्ता, प्रकृती आणि पुरुषांचं शौर्य यांवरील चित्रपटातील संवाद हे एखाद्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच वाटू लागतात. यात ट्रोजन वॉर केंद्रस्थानी नसला तरी ओडिसियसच्या कथेला जितकं गरजेचं आहे, तितका संदर्भ दाखवण्यात आला आहे. होयटे वान होयटेमा यांची सिनेमॅटोग्राफी एखाद्या टाइम मशीनसारखी वाटू लागते. जणू तुम्ही त्या ठिकाणीच उपस्थित आहात, असा भास हा चित्रपट पाहताना होतो. लडविग योरानसोन यांचं संगीत तुमचा हात धरून त्या दृश्यांच्या मूडमध्ये ओढून नेतो. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रॉडक्शन डिझाइन ‘द ओडिसी’च्या पौराणिक बाजूला ‘लार्जर दॅन लाइफ’ अनुभव बनवतात.

कलाकारांचा अभिनय

यातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास, ओडिसियसच्या भूमिकेतील मुख्य कलाकार मॅट डेमनचं अभिनय पाहून तुमच्यातील विविध भावना जागृत होतात. त्याने साकारलेल्या ओडिसियसबद्दल कधी सहानुभूती, कधी खंत तर कधी आदर वाटू लागतो. हेलेन ऑफ ट्रॉयच्या भूमिकेतील लुपिता न्योग्दोच्या निवडीवर बरीच टीका झाली होती. त्यांच्या रंगावरून ही टीक होती. मात्र ती चर्चा साहित्यकारांसाठी सोडता त्यांनी साकारलेली भूमिका बघण्यालायक ठरते.

ग्रीक देवी एथेनाच्या भूमिकेत झेंडायाची निवड का करण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र त्याचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर मिळतं. ट्रोजन वॉरचं नेतृत्त्व करणारा आगामेमननचा भाऊ, स्पार्टाचा राजा मेलेनोसच्या भूमिकेतील जॉन बर्नथल पुन्हा एकदा त्यांच्या दमदार अभिनयाने विशेष छाप सोडतात. हिमेश पटेलचे बोलके डोळे त्याच्या परफॉर्मन्सला आणखी अद्भुत बनवतात. तर कॅलिप्सोच्या भूमिकेत चार्लीज थेरॉनला पाहून थक्क व्हायला होतं.

कलाकारांचं दमदार अभिनय असो, दिग्दर्शन असो, टेक्निकल ताकद असो किंवा लेखनाची जादू असो.. ‘द ओडिसी’ हा या वर्षातील सर्वांत शानदार सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक सिद्ध होईल. यात सुरुवातीला भाषेबद्दलच्या काही गोष्टी खटकतात. या चित्रपटातील भाषा, त्यातील उच्चार या कथेच्या काळाला साजेशा नसून आजच्या काळात बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीसारखे वाटू लागतात. मात्र नंतर ख्रिस्तोफर नोलन यांच्या दिग्दर्शनाची जादू इतकी तगडी होत जाते की तुम्ही भाषेच्या कमकुवत बाजूकडे नकळत दुर्लक्ष करता.

या चित्रपटातील आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, ‘द ओडिसी’ पाहण्यासाठी तुम्हाला ओडिसी, होमर किंवा ग्रीक पौराणिक कथांचं सखोल ज्ञान असण्याची गरज नाही. थ्रिस्तोफर नोलन यांचे चित्रपट समजून घेण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते, असं म्हटलं जातं. मात्र यावेळी नोलन यांनी अशी कोणतीच कोडी उपस्थित केली नाहीत, ज्यामुळे आपण हा चित्रपट पाहण्यासाठी पात्रच नाही, अशी भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणार नाही. ‘द ओडिसी’ हा चित्रपट पूर्णपणे अनुभवावर आधारित आहे. जरी एखाद्याला या चित्रपटातील एखादी गोष्ट खटकली असेल, तरी त्याचा अनुभव कायम लक्षात राहण्यासारखा आहे. त्यामुळे कोणतीही मतं जाणून घेण्यापेक्षा, तुम्ही स्वत: थिएटरमध्ये जाऊन या भव्यदिव्य अशा चित्रपटाचा अनुभव घ्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in