
कृष्णजन्माष्टमीनिमित्त देशभरात दहीहंडीचा उत्साह साजरा होत असताना, मुंबईतील दादर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही दहीहंडी शिवसेना भवनासमोर आयोजित करण्यात आली असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती अपेक्षित आहे.
सकाळपासूनच दादर परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली असली तरी, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके मोठ्या उत्साहात सज्ज झाली आहेत. पावसामुळे गोविंदांचा जोश अधिकच वाढला असून, अनेक गोविंदा पथके पारंपरिक वेशभूषेत दाखल झाली आहेत. आयोजकांनी सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर घटनास्थळी उपस्थित आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, राजकीय दृष्ट्याही या दहीहंडीकडे लक्ष वेधले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे या दहीहंडी महोत्सवाला वेगळीच शोभा येणार आहे.
Leave a Reply