• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची पुन्हा निदर्शने, दादा भुसे यांना काळे झेंडे…

June 29, 2026 by admin Leave a Comment


शिक्षकांसाठीचा TET पेपर फुटल्याने रविवारी २८ जून रोजीचा पेपर रद्द करण्यात आला.त्यामुळे राज्यातील पाच लाखांहून अधिक उमेदवारांना फटका बसला. ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्या बाहेर आंदोलन करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या बाहेर मंत्री दादा भुसे बाहेर पडताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले काळे फडके फडकवण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विधानभवन बाहेर घोषणाबाजी केली.यावेळी पोलिसांना तातडीने या कार्यकर्त्यांनी पकडून व्हॅनमध्ये भरले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षा फुटीप्रकरणात आंदोलन सुरु केले आहे.त्यामुळे देशभरात काँग्रेसची आंदोलने सुरु आहेत. मंत्रालयाच्या बाहेर आणि विधानभवनाबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाही काल आणि आज काँग्रेसने आंदोलन केले आहे.

विधीमंडळ अधिवेशात आज शालेय मंत्री दादा भुसे यांनी TET परीक्षा यापुढे ऑनलाईन घेतली जाईल असे जाहीर केले आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in