
महाराष्ट्रातील छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी सून म्हणून अभिनेत्री तेजश्री प्रधान ओळखली जाते. तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. सध्या तेजश्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने वाढदिवस झाल्यानंतर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये खरं सांगून टाकलं आहे.
तेजश्री प्रधानचा 2 जून रोजी वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी ती उत्तराखंडमधील निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेली होती. तेथे फिरतानाचे फोटो तेजश्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तेजश्रीने नैनितालमधील ट्रिपचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या प्रवासादरम्यान तिने जंगलातील ट्रेकिंगचा आनंद घेतला, डोंगरांमधील सुंदर फुले पाहिले, गरमगरम मॅगी खाण्यातचा आस्वाद घेतला आणि उत्तराखंडमधील प्रसिद्ध मंदिरांनाही भेट दिली.
या ट्रीपचे फोटो शेअर करत तेजश्रीने, “दररोज सकाळी उठल्यावर आपण म्हणतो…वॉव! आपलं आयुष्य सुंदर आहे आणि हीच गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवते! याच सुंदर भावनेची ३८ वर्ष” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
सध्या सोशल मीडियावर तेजश्रीच्या या ट्रीपची आणि फोटोंची चर्चा रंगली आहे. तेजश्रीने एकटीने तिचा वाढदिवस साजरा केला आहे की तिच्या आयुष्यात आणखी कोणी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.




Leave a Reply