• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tej Pratap Yadav: डायनामाइट लावून माझी हत्या करतील..; तेजप्रताप यादव यांचा खळबळजनक दावा, हनीट्रॅपचाही आरोप

August 31, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव सध्या ‘भोजपुरी बवाल’ या शोमुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्याबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आता तेजप्रताप यांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर जवळच्या व्यक्तींनी विश्वासघात करत आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवलं आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ‘भोजपुरी बवाल’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये किशोर अजवानी यांनी तेजप्रताप यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. सोशल मीडियावर पैसे देऊन आपल्याविरोधात अपशब्द वापरायला लावले जात होते, जेणेकरून आपण सार्वजनिक जीवनातून दूर व्हावं, असंही त्यांनी सांगितलं.

माजी पीएवर गंभीर आरोप

तेजप्रताप यादव पुढे म्हणाले, “सोशल मीडियावर माझ्या वडिलांच्या नावाने लिहिण्यात आलं होतं की, ‘मी माझ्या मुलाला घरातून बाहेर काढत आहे.’ पण ते माझ्या वडिलांनी लिहिलं नव्हतं, तर हरियाणातून आलेल्या जयचंदने ते लिहिलं होतं. मी हे सगळं खुलेआम सांगत आहे आणि त्यांना आव्हानही देत आहे. माझ्या वडिलांचं काहीही बिघडवता येणार नाही. माझा पीए मोतीलालही विरोधकांशी मिळाला होता. तो पक्षाचा 20 लाख रुपयांचा निधी घेऊन पळून गेला. त्याने माझा विश्वासघात केला. याच हरियाणाच्या जयचंदने दिल्लीत केंद्रातील एका नेत्याची भेट घेऊन माझी सुरक्षा देखील हटवून घेतली.”

तेजप्रताप यांनी पुढे दावा केला की, त्यांना धमक्याही मिळतात. काही भागात प्रवास करावा लागतो आणि अशावेळी त्यांना सुरक्षिततेची चिंता वाटते. “कदाचित कोणी डायनामाइट लावून देईल. हा जयचंद माझी हत्या करवून देईल,” अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी शोमध्ये केलं.

‘हनीट्रॅपमध्ये अडकवलं, ब्लॅकमेल केलं’

या संपूर्ण प्रकरणात तेजप्रताप यांनी केलेला सर्वात मोठा दावा म्हणजे हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचा. सुरुवातीला पक्षाशी संबंधित कामं करून एका व्यक्तीने आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं आणि केस करून तुरुंगात पाठवण्याची धमकी देत पैसे मागितले गेले, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून 5 ते 10 लाख रुपये मागितले जात होते आणि माध्यमांमध्ये त्यांच्याविरोधात नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला.

तेजप्रताप यांनी यावेळी एका एफआयआरचाही उल्लेख केला आणि सांगितलं, “मोतीलालसोबत तो राहतो. सर्व विरोधकांचा कट आहे. त्यामुळेच तर जिवाला धोका आहे.” तेजप्रताप यांच्या जवळच्या जय सिंह राठोडने नुकतीच एफआयआरची धमकी दिली होती आणि तेजप्रताप यांना ‘क्रिमिनल माईंड’ असंही म्हटलं होतं. मात्र शोमध्ये तेजप्रताप यांनी कोणाचंच नाव घेतलं नाही. “मोतीलाल माझे सर्व अपडेट्स जयचंदला द्यायचा. मी कुठे जातोय, कोणाला भेटतोय, हे सर्व तो सांगायचा. मोतीलालने माझ्या नावाने फसवणूक केली आणि आज माझ्याच पैशांनी कंपनी चालवतोय”, असा आरोप त्यांनी केला. यावेळी तेजप्रताप यांनी शोमध्ये एक रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल
  • पुण्यात रील्स बनवण्याच्या नादात हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जाम; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात
  • Flash Flood : 50 कोटींचे सोने… चांदी आणि रोकड असलेले असंख्य बॉक्स, पुराच्या गाळात नेपाळचा खजिना; बँकांतून…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in