• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : विराट-रोहितनंतर शुबमनही अपयशी, 15 वर्षांपासून विक्रम कायम, प्रतिक्षा केव्हा संपणार?

June 18, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडिया सध्या मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात बुधवारी 17 जून रोजी अफगाणिस्तानवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने यासह मालिका जिंकली. भारतीय संघ या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. कर्णधार शुबमन गिल हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शुबमनने या सामन्यात दीडशतकी खेळी केली. शुबमनला या सामन्यात भारतीय कर्णधार म्हणून मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना जे जमलं नाही ते कर्णधार म्हणून शुबमनला करण्याची संधी होती. मात्र शुबमनही अपयशी ठरला. त्यामुळे भारतीय चाहत्यांची 15 वर्षांपासूनची प्रतिक्षा कायम आहे.

शुबमनने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये 110 बॉलमध्ये 154 धावा केल्या. शुबमनने या खेळीत 22 चौकार आणि 2 षटकार लगावले. मात्र शुबमन 15 वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही हा विक्रम मोडीत काढता आला नाही. रोहित एकदा या विक्रमाच्या जवळ पोहचला होता. मात्र रोहितची थोडक्यात संधी हुकली होती.

वीरेंद्र सेहवागचा 15 वर्षांपासून विक्रम कायम

टीम इंडियासाठी कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. सेहवागने 2011 साली विंडीज विरुद्ध इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 219 धावांची खेळी केली होती. सेहवागने 2011 साली सचिन तेंडुलकर याचा कर्णधार म्हणून 12 वर्षांआधीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला होता. सचिनने 1999 साली न्यूझीलंड विरुद्ध कर्णधार म्हणून नाबाद 196 धावा केल्या होत्या.

रोहितची संधी थोडक्यात हुकली

रोहित शर्मा याला 2017 साली सेहवागचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती. मात्र रोहितची संधी काही धावांनी हुकली. रोहितने तेव्हा श्रीलंकेविरुद्ध नाबाद 208 धावा केल्या होत्या. तर विराटने 2018 साली कर्णधार म्हणून 150 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र विराटलाही यश आलं नव्हतं. विराटने तेव्हा विंडीज विरुद्ध 157 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 160 धावा केल्या होत्या.

शुबमन विराट-रोहितला पछाडण्यात अपयशी

दरम्यान शुबमन कर्णधार म्हणून विराट आणि रोहित या दोघांना मागे टाकण्यात अपयशी ठरला. शुबमनची कर्णधार म्हणून 154 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. शुबमनला द्विशतकाची संधी होती. मात्र शुबमन तिथवर पोहचण्यात अपयशी ठरला. मात्र शुबमनमध्ये द्विशतक करण्याची क्षमता असल्याचं त्याने याआधी दाखवून दिलंय. तसेच शुबमन ओपनर आहे. ओपनरला मोठी खेळी करण्याची सर्वाधिक संधी असते. त्यामुळे शुबमन येत्या काही वर्षांत हा विक्रमही मोडीत काढेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in