• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TATA Motors : टाटाची कुठलीही कार विकत घेण्याचा विचार असेल तर त्वरा करा, 1 जुलै नंतर नको

June 12, 2026 by admin Leave a Comment


जर, तुम्ही टाटा मोटर्सची नवीन कार किंवा SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण टाटा मोटर्सने घोषणा केली आहे की, जुलै 2026 पासून ते आपल्या सर्व पॅसेंजर व्हीकल्सच्या किंमती वाढवणार आहेत. याचा परिणाम कंपनीच्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक सर्व प्रकारच्या वाहनांवर पहायला मिळेल.

वेगवेगळे मॉडल आणि वेरिएंटच्या हिशोबाने किंमतीमध्ये जवळपास 1.5 टक्क्याची वाढ होऊ शकते, असं कंपनीने म्हटलं आहे. कुठल्या मॉडलची किती किंमत वाढणार हे अजून स्पष्ट नाहीय. प्रत्येक कारवर वेगवेगळा परिणाम होईल. म्हणून कुठला ग्राहक कार खरेदीचा विचार करत असेल, तर जून महिना त्याच्यासाठी जास्त फायद्याचा ठरु शकतो.

टाटा मोटर्सनुसार कार बनवण्याचा खर्च वाढत चालला आहे. यात अनेक प्रकारच्या गोष्टी असतात

कच्चा मालाची किंमत वाढणं

कारचे पार्ट्स महागणं

फॅक्ट्री आणि प्रोडक्शन खर्च वाढणं

जगभरात पुरवठ्याच्या समस्या

या कारणांमुळे कंपनीवर खर्चाचा बोजा वाढला आहे. म्हणून ग्राहकांना आता जास्त किंमत द्यावी लागेल.

कुठल्या कारसवर परिणाम होईल

टाटा मोटर्सच्या लाइनअपमध्ये अनेक लोकप्रिय कारस आहेत. किंमत वाढल्याचा परिणाम या मॉडल्सवर होईल.

Tata Tiago

Tata Tigor

Tata Altroz

Tata Punch

Tata Nexon

Tata Curvv

Tata Harrier

Tata Safari

त्याशिवाय कंपनीच्या इलेक्ट्रीक कारच्या किंमती सुद्धा वाढतील.

ग्राहकांनी काय केलं पाहिजे?

जर, तुम्ही टाटाची कुठली कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ आहे. कारण 1 जुलैच्या आधी कार विकत घेतली, तर जास्त किंमत चुकवावी लागणार नाही. ज्या लोकांचा Nexon, Punch, Harrier किंवा Safari सारखी SUV विकत घेण्याचा प्लान असेल, त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in