• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्या

June 10, 2026 by admin Leave a Comment


IND W vs PAK W, T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत क्रीडारसिकांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 14 जून रोजी एजबेस्टनच्या ऐतिहासिक मैदानात होणार आहे. त्यामुळे या सामन्याची आतापासूनच चर्चा रंगली आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सकारात्मक सुरूवात कोण करणार? याकडे लक्ष लागून आहे.

कोणाचं पारडं वरचढ?

भारत आणि पाकिस्तान महिला संघात भारतीय संघ वरचढ आहे. महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने पाकिस्तानला अनेकदा पराभवाची धूळ चारली आहे. भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ कायम कमकुवत दिसला आहे. भारत आणि पाकिस्तान महिला संघात कधीच टी20 मालिका खेळली गेलेली नाही. पण हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धा, आशिया कप आणि एशियन्स गेम्स किंवा कॉमनवेल्थ स्पर्धेत आमनेसामने आले आहेत. आतापर्यंत या दोन्ही संघात 16 सामने झाले आहे. त्यापैकी 13 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यात पाकिस्तानच्या पदरी विजय पडला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत या दोन्ही संघात 8 सामने झाले आहेत. यापैकी 6 सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. तर फक्त दोन सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. आता नवव्यांदा हे दोन्ही संघ भिडणार आहे. त्यामुळे या सामन्या कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. दोन्ही शेवटचे 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भिडले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानला 6 विकेट राखून मात दिली होती.

दोन्ही संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील प्रवास

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी एकमेकांपेक्षा भिन्न आहे. भारताने अनेकदा बाद फेरीत जागा मिळवली आहे. तर पाकिस्तानचा संघ प्रत्येकवेळी साखळी फेरीच्या पुढे जाताना संघर्ष करताना दिसला आहे. भारताने 2020 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण पदरी निराशा पडली. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in