• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sushma Andhare On BJP | मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला…; 6 खासदारांच्या बंडाच्या चर्चांदरम्यान सुषमा अंधारेंचा स्फोटक दावा!

June 17, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असून, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित खासदारांनी दिल्लीत महत्त्वाच्या बैठका घेतल्या असून, पुढील राजकीय रणनीतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही दिल्ली दौऱ्यामुळे या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

राजकीय वर्तुळात या खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असताना, आगामी काळात त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी निधी, राजकीय संधी आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत चर्चा झाल्याचीही चर्चा सुरू आहे. तथापि, या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस तुमच्या एका मुख्यमंत्रि‍पदासाठी तुम्ही एक भस्मासूर जन्माला घातला. आता भस्मासूराची ताकद ऐवढी वाढली की, तुमच्या डोक्यावर हात ठेवायला कमी करणार नाही, इथपर्यंत हात सरसावले आहेत. फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये, म्हणून फडणवीसांच्याच पक्षातले दिल्लीतील नेते फडणवीस दिल्लीत पोहोचू नये, याकरिता लांबसडक स्पीड ब्रेकर टाकण्याच्या तयारीत आहेत. अगदी दिल्ली टू दरे..

सुषमा अंधारे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी एकनाथ शिंदे यांना भस्मासूर म्हटले आहे. 6 खासदारांच्या फुटीदरम्यान सुषमा अंधारे यांच्याकडून हे भाष्य करण्यात आले. राज्यातील राजकारणात पुढच्या काही तासात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in