• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunil Gavaskar : वैभव सूर्यवंशीच्या मुद्यावरुन सुनील गावस्कर भडकले, सरळ बोलले आता इंग्लंडमध्ये तरी..

June 29, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशीची सिनियर टीम इंडियात निवड झाली तेव्हा सर्वांना असं वाटलेलं की, आयर्लंड विरुद्ध T20 सीरीजमध्ये त्याला डेब्यूची संधी मिळेल. वैभवचं वय 15 वर्ष आहे. वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला असता, तर सचिन तेंडुलकरचा 36 वर्षांपासूनच रेकॉर्ड मोडीत निघाला असता. पण आयर्लंड दौऱ्यात असं होऊ शकलं नाही. बेलफास्टमध्ये सीरीज सुरु होण्याच्या पूर्वसंध्येलाच टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी स्पष्ट केलं की, इन फॉर्म फलंदाजांना वगळून वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार नाही. आता भारताला आयर्लंड सारख्या टीमकडून 2-0 ने मालिका गमावावी लागली आहे. आयर्लंडला दुबळं म्हणणार नाही, कारण त्यांनी वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला हरवलं आहे. या पराभवानंतर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर स्पष्ट शब्दात म्हणाले की, वैभवला संधी मिळू शकली असती. पण निदान आता त्याला इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात तरी संधी द्या.

एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना सुनील गावस्कर यांनी भारताच्या पराभवावर भाष्य केलं. “आजच्या टीममध्ये दोन नवे खेळाडू होते. प्रिन्सने खूप चांगली गोलंदाजी केली. तीन विकेट घेतले. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली, तिथेही सिक्स मारला. एक महिन्यापासून मी हे बोलत होतो की, आयर्लंड विरुद्ध जे दोन सामने आहेत, सध्या वैभव सूर्यवंशीचा जो फॉर्म आहे, त्याला खेळवता आलं असतं” असं सुनील गावस्कर बोलले. “तुम्ही असं करु शकला असता. पण असं घडलं नाही. वैभव आहे म्हणून मॅच जिंकलो असतो असं नाहीय. तो कदाचित 10-15 रन्स करुन आऊट झाला असता. पण तुम्ही युवा खेळाडूला संधी द्यायला पाहिजे होती. ट्राय करण्यासाठी हे दोन सामने चांगली संधी होती” असं सुनील गावस्कर बोलले.

त्यांना बाहेर ठेवा

इंग्लंड विरुद्धही वैभवला आता संधी मिळणार नाही का, कारण भारत आता कोणताही धोका पत्करणार नाही. त्यावर गावस्कर बोलले की, “त्यांनी वैभवला आता पहिल्याच सामन्यात खेळवावं. सरळ गोष्ट आहे, जे आऊट ऑफ फॉर्म फलंदाज आहेत, त्यांना बाहेर ठेवा. वैभव सूर्यवंशीला खेळवा. वैभवला तुम्हाला पहिल्या सामन्यात खेळवावं लागेल” एक जुलैपासून इंग्लंड विरुद्ध सीरीजला सुरुवात होत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in