• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunetra Pawar : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

April 18, 2026 by admin Leave a Comment


काल महिला आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत पडलं. हा केंद्रातल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मोठा धक्का आहे. कारण केंद्रात भाजप प्रणीत एनडीए आघाडीकडे बहुमत आहे. केंद्रातल्या मोदी सरकारने आतापर्यंत अनेक विधेयकं मंजूर करुन घेतली आहेत. मोदी सरकार कुठलही विधेयक विचारपूर्वक मांडून ते मंजूर करुन घेतं. आवश्यक सहमती बनवण्यासाठी रणनिती आखली जाते. पण महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतीत असं घडलं नाही. या विधेयकाबद्दल बरीच चर्चा झाली. पण लोकसभेच्या पटलावर त्यावर मंजुरीची मोहोर उमटू शकली नाही. हा एनडीए सरकारसाठी एक प्रकारचा झटका आहे.

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील महिला नेत्या यावर प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा यावर बोलल्या आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करुन मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.

कालचा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीय.

महिलांना १/३ आरक्षण देणारं 131वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही तथापि जाणीवपूर्वक होऊ दिल नाही आणि विरोधकांची महिला-विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली.

महिला सशक्तीकरणाच्या नावावर…

— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 18, 2026

“कालचा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीय. महिलांना १/३ आरक्षण देणारं 131वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही तथापि जाणीवपूर्वक होऊ दिल नाही आणि विरोधकांची महिला-विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला सशक्तीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला नकार हा अहंकार नव्हे तर देशातील महिलांवर केलेला अन्यायचं आहे. पण महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही…नारीशक्ती उत्तर देईल! असं सुनेत्रा पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं सर्टिफिकेट? होणार चौकशी
  • बॉलिवूडच्या 3 टॉप अभिनेत्री, 2 अभिनेत्रींनी सोडलं करिअर, तिसरी अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड
  • तुमच्या घरातील मंदिर नेमकं कोणत्या दिशेला असावं? जाणून घ्या….
  • डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगाला ज्याची भीती तेच घडले, थेट बॉम्ब..
  • Amravati scandal : ‘हाय-हॅलो छोडो, आप…’ मुलींना अस अडकवलं जाळ्यात,आरोपी अयानचा ‘लव्ह गुरु’ कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in