• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amravati scandal : ‘हाय-हॅलो छोडो, आप…’ मुलींना अस अडकवलं जाळ्यात,आरोपी अयानचा ‘लव्ह गुरु’ कोण?

April 18, 2026 by admin Leave a Comment


Amravati case: अमरावतीच्या परतवाडा येथील लैँगिक शोषण आणि त्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले, या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे. एसआयटीच्या चपासात,या प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोप अयानला लव्हगुरू हा टिप्स द्यायचा असं समोर आलं आहे . मुख्य आरोपी अयान अहमदने मुलींना जाणीवपूर्वक जाळ्यात अडकवून त्यांचे शोषण केले. त्यासाठी त्याने एका तथाकथित ‘लव्ह गुरू’ची मदतही घेतली होती. विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून तो मुलींना जाळ्यात ओढायचा असाही आरोप करण्यात आला आहे.

आरोपी अयान याने त्याचा मित्र मानव सुगंधे याच्या कथोरा रोडवरील भाड्याच्या फ्लॅटचा सात ते आठ वेळा वापर केला होता असं एसआयटीच्या तपासादरम्यान उघड झालं आहे. या खुलाशानंतर, पोलिसांनी फ्लॅट मालकाला चौकशीसाठी बोलावलं. मात्र अयानच्या या कृत्यांची फ्लॅट मालकाला माहिती होती की नाही, ते शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अयानच्या लव्हगुरूचा शोध सुरू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींशी बोलण्यासाठी आरोपी अयान हा एक विशिष्ट पद्धत अवलंबवायचा. विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून तो मुलींना जाळ्यात ओढायचा. सुरूवातीलच तो मुलींना डायरेक्ट सवाल करायचा – ‘ हाय, हॅलो छोडो, आप वही हो ना जो वहां मिले थे? ‘ असा प्रश्न विचारून तो समोरच्या मुलीला बोलण्यात अडकवून हळूहळू त्यांचा विश्वास जिंकायचा आणि मग जाळ्यात अडकावयचा. एवढंच नव्हे तर अयानने मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी कथित लव्हगुरूकडून टिप्सही घेतल्या होत्या, ज्यांच्या मदतीने तो मुलींना टार्गेट करायचा, असंही तपासात समोर आलं आहे. अयानचा तो लव्हगुरू कोण, तो कुठला याचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

कॅफेमध्ये तरूणींशी भेट

SITच्या तपासात आणखीही काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी अयान हा ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण करत होता त्याच भागात असलेल्या “द कॅफे रॉयल 10” मध्ये देखील तो मुलीांना घेऊन जायचा. एवढंच नव्हे तर या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला चारशे रुपये द्यायचा. या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच आरोपी अयान हा अमरावतीसह अचलपूर, परतवाडा मधील कॅफेमध्ये मुलींना घेऊन जायचा. एवढंच नव्हे तर त्या कंपार्टमेंटमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळेही चालत असल्याचंही उघड झालंय. पोलिसांकडून या कॅफे मालकांची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाची पाळंमुळं आता वझ्झर डॅम गार्डन पर्यंत पोहोचली आहेत. तिथेच आरोपी आणि पीडित तरूणांची भेट झाल्याची माहिती उघड झाली होती. पोलिसांचे पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी याप्रकरणाशी संबंधित माहिती गोळा केली होती. याप्रकरणी SITने आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तपास यंत्रणांकडून प्रत्येक मुद्याच्या अनुषंगाने तपास केला जात असून संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणाशी निगडीत फोटो आणि व्हिडीओ हे फेसबूक, इन्स्टाग्राम, टेलीग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते. सायबर सेलच्या मदतीने आत्तापर्यंत 41 अकाऊंट्स डिलीट करण्यात आली आहेत.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डिझेल इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअर! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 5 कार, किंमत 9.8 लाखांपासून सुरू
  • Pravin Togadia : वाईट नियत ठेऊन महिलांजवळ जाणाऱ्याला बसणार इलेक्ट्रिक शॉक, प्रवीण तोगडिया काय म्हणाले?
  • 45 वर्षीय श्वेता तिवारीने शेअर केले वेकेशन फोटो, फिटनेस आणि सौंदर्य पाहून चाहते थक्क
  • तर लोकशाही संपुष्टात आली असती… मसिहा बनण्याचा प्रयत्न करू नका; प्रियंका गांधी यांनी भाजपला सुनावले
  • Nashik | TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं सर्टिफिकेट? होणार चौकशी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in