• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Strait of Hormuz : अखेर स्ट्रेट ऑफ होर्मूजची कोंडी फुटली, या दोन छोट्या देशांकडून अमेरिकेचा मोठा गेम, ट्रम्प हात चोळत बसले

April 21, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. एकीकडे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केली आहे.स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अनेक जहाजं होर्मजूच्या सामुद्रधुनीमध्ये अडकून पडली आहेत, याचा फटका भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली असून, या बातमीमुळे संपूर्ण जगालाच मोठा दिलासा मिळणार आहे. जगाला आता तेल वाहतुकीसाठी नवा रस्ता खुला होणार आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगाची सध्या मोठी अडचण निर्माण झाली आहे, मात्र आता इराक आणि सीरियाने स्ट्रेट ऑफ होर्मूजला नवा पर्याय शोधून काढला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता हा नवा रस्ता तेल वाहतुकीसाठी जगाची नवी लाइफलाईन ठरणार आहे. इराक आणि सीरियामधला हा मार्ग जगासाठी केवळ एक रस्ताच ठरणार नाहीये, तर भविष्यात तेलाच्या राजकारणामधील एक महत्त्वाचा मोड म्हणून समोर येऊ शकतो.

इराक आणि सीरियाने मिळून राबिया-यरुबिया बॉर्डर क्रॉसिंग पुन्हा एकदा सुरू केलं आहे. 2011 मध्ये सीरियात गृहयुद्ध उफाळून आलं होतं, तेव्हापासून हा रस्ता बंद होता. त्यानंतर त्यावर ISIS ने ताबा मिळवला होता. मात्र आता ही बॉर्डर क्रॉसिंग पुन्हा एकदा सुरू करण्यात यश आलं आहे. या मार्गाने समुद्रातून नाही तर रस्त्याने तेलाची वाहतूक आणि इतर वस्तूंची वाहतूक होणार आहे. दरम्यान हा रस्ता आता ओपन झाल्यानं स्ट्रेट ऑफ होर्मूजवरील अवलंबित्व कमी होणार आहे. या मार्गाबाबत बोलताना सीरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा रस्ता युद्धादरम्यान एक सुरक्षित मार्ग ठरू शकतो. दरम्यान जर स्ट्रेट ऑफ होर्मूज वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस बंद राहिला तर संपूर्ण जगासाठी हा  मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..”
  • Devendra Fadnavis UNCUT | बारामतीच्या सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव, म्हणाले दादांच्या जाण्याने…
  • वैभव सूर्यवंशीचं ते अधुरं स्वप्न, वडिलांची…पहिल्यांदाच मनातलं गुपित बोलून दाखवलं; तुम्हालाही वाटेल अभिमान!
  • शरद पवार यांची रुग्णालयातून पहिली पोस्ट, दोन दिवसानंतर काय म्हणाले? पहिल्यांदाच व्यक्त केली खंत?
  • 6 मिनिटे 7 सेकंदांचे ते गाणे… 43 वर्षांनंतरही लोक आवडीने गुणगुणतात; यूट्यूबवर 115 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in