• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..”

April 21, 2026 by admin Leave a Comment


कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. अभिनेता अक्षय मुडावदकर हे गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही मालिका सोडली होती. मालिका सोडल्यानंतर अक्षय हे सोशल मीडियावर सक्रिय असून विविध अपडेट्स ते चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ते अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते. या प्रवासाचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

“कधी कधी मन शांत करायला एक प्रवास, एक ठिकाण पुरेसं असतं. आज मी निघालोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाकरिता. चला तर मग तुम्हालाही घेऊन जातो. रस्ते तेच, भावना त्याच… प्रत्येक किलोमीटरसोबत मन थोडं थोडं हलकं होत चाललं आहे. अक्कलकोटला जात असताना मला कायम असं वाटतं की हा प्रवास फक्त अंतराचा नाही तर अंतर्आत्म्याकडे जाण्याचा आहे, ही भावना फार वेगळी आहे, नेक्स्ट लेव्हल आहे,” असं अक्षय या व्हिडीओत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Mudawadkar (@akshaymudawadkar.official)

दर्शनानंतर त्यांनी आपला अनुभव सांगितला. “स्वामींचं दर्शन झालं आहे आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे. हा प्रवास खूपच सुंदर होता, अविस्मरणीय होता. इथे आलं की कायमच खूप शांत वाटतं. खरंतर देवाकडे काही मागणार नाही, आपण फक्त कृतज्ञ व्हायचं असतं आणि देव जे देईल ते स्वीकारायचं असतं,” अशा शब्दांत ते व्यक्त झाले. अक्षय यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘डोळे बंद करून स्वामींचं स्मरण केलं की तुमचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. आमच्यासाठी तुम्हीच स्वामी आहात,’ असं एकाने लिहिलं. तर ‘मला तुमच्यात श्री स्वामी समर्थ दिसतात, कारण तुम्ही मला श्री स्वामी समर्थांसारखे दिसता,’ अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘स्वामी स्वामींच्या भेटीला.. तुम्हाला बघून डोळ्यात पाणी आलं’, अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका सोडल्यानंतर अक्षय यांनी व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले होते. “गेली 5 वर्षे आणि 1750 हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याकरता मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद मानतो. त्याचबरोबर तुम्ही रसिक प्रेक्षकांनी गेली पाच वर्षे भरभरून प्रेम दिलं, त्याकरता मी तुमचा कायम ऋणी असेन. पण ज्याप्रमाणे एखादा प्रवास जेव्हा सुरू होतो, तेव्हा तो कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. याचप्रमाणे माझासुद्धा स्वामींच्या भूमिकेतील प्रवास हा इथवरच होता. हा प्रवास जरी इथे थांबत असला तरी ही भूमिका आणि हा प्रवास माझ्यासाठी कायम खास असेल. भविष्यात मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी कायम अग्रस्थानी असेल,” असं त्यांनी म्हटलं होतं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
  • पाळणा हलणार! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
  • PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा
  • किआचा धमाका! नवी ‘Syros’ लाँच, किंमत 27 हजारांनी कमी आणि फीचर्समध्ये मोठी वाढ
  • IPL 2026 Points Table : घेणं नाय देणं, दिल्लीच्या पराभवाचा राजस्थानला फटका, हैदराबादची झेप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in