• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाळणा हलणार! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

April 21, 2026 by admin Leave a Comment


Pooja Banerjee Pregnancy : बॉलिवूडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असतं. नुकतेच प्रसिद्ध असलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची खुशखबर दिली. ही खुशखबर समजताच दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या दोघांनीही आपल्या मुलीच्या हातात प्रेग्नेंसी किट देऊन लवकरच घरी नवं बाळ येणार असल्याची खबर दिली. दरम्यान, एकीकडे ही आनंदाची बातमी आलेली असतानाच आता दुसरीकडे आणखी एका कपलने खुशखबर दिली आहे. या कपलने लवकरच आम्ही आई-बाबा होणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे ही गोड बातमी देताना अभिनेत्रीने हातात प्रेग्नेंसी किट घेऊन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला लाखोंनी लाईक्स मिळाले आहेत.

कोण होणार आई-बाबा?

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या पूजा बॅनर्जीने मी आई होणार असल्याचे सांगितले आहे. आता पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा हे दोघेही आई-बाबा होणार आहेत. दोघेही छोट्या पडद्यावर काम करणारे प्रसिद्ध कलाकार आहेत. आई होणार असल्याने पूजा बॅनर्जी खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे. पूजा आणि कुणाल यांना अगोदरच एक मुलगा आहे. आता ते कपल दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. ही खुशखबर मिळाल्याने त्यांचे पूर्ण कुटुंब खूपच आनंदी आहे. विशेष म्हणजे प्रेग्नेंट राहिल्यानंतर शरीरात होत असलेल्या बदलांना ती अनुभवते आहे. एका व्हिडीओमध्ये तिने तिचे बेबी बम्प दाखवलेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)

पूजा-कुणालची लव्हस्टोरी

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांनी एप्रिल 2020 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2021 रोजी पुन्हा एकदा बंगाली प्रथेनुसार लग्न केलं. तुझ संग प्रित लगाई सजना या मालिकेत दोघांनी सोबत काम केले. त्यानंतर दोघांमध्ये जवळिक निर्माण झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. पूजा सोशल मीडियावर सक्रीय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो अपलोड करते.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : आता थांबवून दाखवाच! मुंबई टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?
  • SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
  • पाळणा हलणार! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
  • PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा
  • किआचा धमाका! नवी ‘Syros’ लाँच, किंमत 27 हजारांनी कमी आणि फीचर्समध्ये मोठी वाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in