• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : आता थांबवून दाखवाच! मुंबई टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?

April 21, 2026 by admin Leave a Comment

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे मुंबईवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र मुंबईने सोमवारी 20 एप्रिलला गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने अहमदाबादमध्ये गुजरातला पराभूत करत सामना जिंकला. मुंबईचा गुजरात विरुद्धचा अहमदाबादमधील पहिला तर एकूण दुसरा विजय ठरला. आता मुंबई आपल्या मोहिमेतील सातवा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी मुंबईची ताकद वाढली आहे.

चेन्नई विरूद्धच्या सामन्याला काही तास बाकी असताना मुंबईच्या गोटात मॅचविनर खेळाडूची एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विल जॅक्स मुंबईसह जोडला गेला आहे. त्यामुळे मुंबईची बाजू आणखी भक्कम झाली आहे. विल ऑलराउंडर आहे. तो बॅटिंगसह बॉलिंग करण्यात माहीर आहे. तसेच तो ओपनिंगही करतो. त्यामुळे विलला रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत मुंबईकडून ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. गुजरात विरूद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक याच्यासोबत डेब्युटंट दानिश मालेवार याने ओपनिंग केली होती. मात्र दानिश अपयशी ठरला होता. त्यामुळे विलला संधी मिळाल्यास तो ओपनिंगला खेळताना दिसू शकतो.

आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्स टीम : नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रायन रिकेल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), राज बावा, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, तिलक वर्मा,ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, मयंक मार्कंडे, अल्लाह गझनफर, शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, रॉबिन मिन्झ, रघु शर्मा, मोहम्मद सलाहुद्दीन इझार, दानिश मालेवार आणि मयंक रावत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : आता थांबवून दाखवाच! मुंबई टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?
  • SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
  • पाळणा हलणार! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
  • PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा
  • किआचा धमाका! नवी ‘Syros’ लाँच, किंमत 27 हजारांनी कमी आणि फीचर्समध्ये मोठी वाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in