
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत सांगता सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे योगदान मोठे असून, राज्याला दिशा देणारे दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केला. “आवश्यकतेनुसार कणखर आणि प्रसंगी संवेदनशील असा समतोल स्वभाव असलेलं नेतृत्व तयार होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते,” असं फडणवीस म्हणाले.
तसेच, अजित पवार यांनी राज्यात 11 अर्थसंकल्प सादर करत विकासाचा मार्ग आखला असल्याचं त्यांनी नमूद केलं. “त्यांचं जाणं हे केवळ कुटुंबीय किंवा बारामतीपुरतं मर्यादित नुकसान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे,” असं म्हणत फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण आणखी भावूक झालं असून, पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply