• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ST Bus Accident In Gujarat: महाराष्ट्रातील बसचा गुजरातमध्ये कसा झाला अपघात? धक्कादायक कारण समोर, डिझेलची टाकी…

June 5, 2026 by admin Leave a Comment


गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या भयानक धडकेनंतर एक बस दरीत कोसळून तिने पेट घेतला. आग लागल्याने मोठा स्फोटही झाला, ज्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली. या दुर्दैवी घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 41 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र मृतांचा आखडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उवा गावाजवळ सुरत-धुळे मार्गावरील या अपघाततामुळे प्रचंड खळबळ माजली. हा अपघात प्रचंड भीषण होता, आत्तापर्यंत कशीबशी फक्त एका मृताची ओळख पटवण्यात यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं.

महाराष्ट्रातील बसचा गुजरातमध्ये कसा झाला अपघात?

गुजरातमध्ये महामंडळाच्या दोन बसेसच्या या भीषण अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. – महामंडळाची बस, त्यांच्यासुरक्षिततेबाबत आणि दर्जाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या बारडोली तालुक्यात उवा आणि माणिकपूर गावांच्या दरम्यान हा अपघात घडला.

गुजरात राज्य परिवहन (एसटी) बसची महाराष्ट्र राज्य परिवहन बसला समोरून धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, गुजरात राज्य परिवहन बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला तेव्हा महाराष्ट्र डेपोची बस धुळियाहून नवापूरमार्गे सुरतला जात होती. उवा गावाजवळ सुरत-धुळे मार्गावरील बसने पाण्याच्या टँकरला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटलं. आणि याच नियंत्रण सुटलेल्या बसची समोर येणाऱ्या जामनेर-सुरत या बसशी जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती जामनेर-सुरत बस धाडकन खाली कोसळली.

डिझेलची टाकी फुटल्यामुळे आग ?

ही बस खाली पडली आणि तिने काही क्षणांत पेट घेतला. त्यावेळी काही स्फोटाचा आवाजही आले. डिझेलची टाकी फुटल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग वेगाने पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.  काही प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र इतर अनेक जण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या अपघातात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं.  दरम्यान मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची तर PMOकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

Deeply pained to hear about a mishap in Surat district, Gujarat. My condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. Rescue operations are underway and authorities are providing all possible assistance at the accident site.

An…

— PMO India (@PMOIndia) June 2, 2026

अपघाताची माहिती मिळताच, बार्डोली अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्डोलीला पाठवण्यात आले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत-धुळे बसमध्ये 33 प्रवासी, तर जामनेर-सुरत बसमध्ये 26 प्रवासी प्रवास करत होते. मात्र या भीषण अपघातानंतर महामंडळाच्या बस, त्यांच्या सुरक्षिततेचे निकष आणि तांत्रिक तपासणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…
  • एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…
  • अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट
  • कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…
  • IRE vs IND: आयर्लंड दौऱ्यात इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीचं टी20 पदार्पण असेल खास! जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in