• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sonam Wangchuk Ends Hunger Strike : सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण

July 24, 2026 by admin Leave a Comment


सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दोन्ही मंत्र्यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली. सोनम वांगचूक यांनी सहज हे उपोषण सोडलं नाही. त्यांच्या काही अटी केंद्र सरकारला मान्य करायला लावल्या. त्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडलं आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मार्च काढला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या प्रकरणात विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही असा शब्द सराकरने त्यांना दिला आहे.

पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी संसदेत सरकार चर्चा करेल असं आश्वासन त्यांना दिलं आहे.

नीट (NEET) पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार होईल असं आश्वासन सरकारने दिलं आहे.

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या या निर्णयांची माहिती दिल्यानंतर सोनम वांगचूक यांनी नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in