• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sonam Wangchuk : 15 ऑगस्टपूर्वी सोनम वांगचूक यांची एक खास पोस्ट, देशवासियांना आवाहन करताना म्हटलं भारतापेक्षा बांग्लादेश पुढे

August 14, 2026 by admin Leave a Comment


विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनाआधी देशवासियांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी ‘शांती क्राती’ सुरु करण्याचं आवाहन केलय. जर, भारताला 2047 पर्यंत एक विकसित आणि संपन्न राष्ट्र बनवायचं असेल तर देशाला आपल्या राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करावा लागेल. वांगचूक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज पोस्ट केलाय. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलय की, “मागच्या काही दिवसांपासून मी आजारी होतो. या दरम्यान मी देशाच्या भविष्याबद्दल विचार करत होतो” त्यांनी देशवासियांना निस्वार्थ, निर्भीड आणि चरित्रवान लोकांची नावं सुचवण्याचं आवाहन केलं आहे, जे भारताच्या भविष्याबद्दल नवीन विचार देण्यास सक्षम असतील. ‘देशातील विद्यामान परिस्थिती पाहून निराश व्हायला होतं’ असं वांगचूक म्हणाले.

भारताच्या मागे असलेले किंवा समान पातळीवर असलेले अनेक देश आज भारताच्या पुढे निघून गेले आहेत. त्यांनी थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांग्लादेश या देशांची उदाहरणं दिली. प्रती व्यक्ती त्यांच्या जीडीपीचा उल्लेख केला. विद्यमान स्थिती कायम राहिली, तर 2047 पर्यंत विकसित देश बनण्याच्या लक्ष्यापासून भारत लांब जाऊ शकतो असा इशारा त्यांनी दिला. देशाची शिक्षण व्यवस्था मागास राहिली, तर भविष्य सुद्धा तसच असेल असं सोनम वांगचूक म्हणाले. अलीकडे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा दाखला देत सोनम वांगचूक म्हणाले की, लोकांनी बदलाची मागणी केलेली आणि काही बदल पहायला मिळाले. त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केला. नव्या शिक्षण मंत्र्यांकडून सुद्धा काही मोठे बदल होतील असं दिसत नाहीय असं सुद्धा वांगचूक यांनी नमूद केलं.

THIS INDIPENDENCE DAY, I NEED YOUR HELP…
This country needs a peaceful revolution, at least in how we chose our leaders… if we are to remain even a respectable nation by 2047.
Close to half of our MPs have criminal cases and a third have serious charges like murder, rape &… pic.twitter.com/10byPuzwtX

— Sonam Wangchuk (@Wangchuk66) August 13, 2026

नव्या स्वरुपात आधीपेक्षा जास्त मोठं आव्हान

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांविरोधात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी कारवाई केली. म्हणून ही समस्या कुठल्या एका राजकीय पक्षापुरती मर्यादीत नाही. वांगचूक यांनी 2012-13 सालच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा उल्लेख केला. त्यावेळच्या आंदोलनाने सरकार बदलेलं असं ते म्हणाले. पण आता 12 वर्षानंतर भ्रष्टाचार आणि अन्याय नव्या स्वरुपात आधीपेक्षा जास्त मोठं आव्हान बनून समोर उभा आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी भाजपासाठी तयारी, आता शिंदे गटाच्या वाटेवर, धाराशिवच्या त्या 5 नगरसेवकांची राज्यात चर्चा
  • प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in