• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SLA vs AFGA : श्रीलंका-अफगाणिस्तानमध्ये टफ फाईट, कोण पोहचणार फायनलमध्ये?

June 18, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेत आयोजित ट्राय सीरिज ए  अखेरच्या टप्प्यात आहे. इंडिया ए टीमने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर अंतिम फेरीतील उर्वरित 1 जागेसाठी दोघांमध्ये चुरस आहे. या तिरंगी मालिकेतील साखळी फेरीतील सहाव्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान श्रीलंका ए विरुद्ध अफगाणिस्तान ए आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत होणऱ्या संघाचं पॅकअप होईल. त्यामुळे कोणता संघ फायलनमध्ये धडक देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इम्रान मीर याच्याकडे अफगाणिस्तान ए टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर सहान अरचिगे यजमान संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रीलंका ए विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील या व्हर्च्युअल सेमी फायनलबाबत जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना शुक्रवारी 19 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

श्रीलंका आणि अफगाणिस्तानपैकी कोणता संघ पोहचणार फायनलमध्ये?

𝐍 𝐄 𝐗 𝐓 𝐌 𝐀 𝐓 𝐂 𝐇! ⚔

🆚 Sri Lanka A 🇱🇰
🏆 A Teams’ Tri-Nation Series 2026
🕘: 9:00 PM (AFT)
📆 Tomorrow, June 19
🏟 Dambulla International Cricket Ground, Dambulla #AfghanAbdalyan | #GloriousNationVictoriousTeam | #e& – Go for More | #SuperCola – Share the Love pic.twitter.com/9lGw789U2X

— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 18, 2026

श्रीलंका-अफगाणिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान श्रीलंका-अफगाणिस्तान दोन्ही संघांची ही या मालिकेतील साखळी फेरीत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 13 जून रोजी सामना झाला होता. तेव्हा श्रीलंकेने अफगाणिस्तानवर डीएलएसनुसार 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता श्रीलंका पुन्हा विजय मिळवून अंतिम फेरीत पोहचणार की अफगाणिस्तान गेल्या पराभवाची परतफेड करुन फायनलचं तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरणार? यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार
  • ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट मुलानेच..
  • ‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा
  • मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही दादरमध्ये मोठी शोधाशोध
  • Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in