
वटपौर्णिमेनिमित्त सर्वसाधारणपणे पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करताना दिसतात. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 17 वर्षांपासून एक वेगळी आणि आगळी परंपरा जपली जात असून, येथे पुरुष आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत वटपौर्णिमा साजरी करतात.
या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या पुरुषांनी पत्नीच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी हे व्रत करत असल्याचे सांगितले. “घरातील प्रत्येकाची काळजी घेणारी, सर्वांच्या आधी उठून दिवसाची सुरुवात करणारी आणि सर्वजण झोपल्यानंतरही घराची जबाबदारी सांभाळणारी पत्नी कुटुंबासाठी आयुष्यभर त्याग करत असते. ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते. तिच्या या त्यागाचा सन्मान म्हणून आम्हीही तिच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी वडाची पूजा करतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गेल्या 17 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या परंपरेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, समाजात स्त्री-पुरुष समानतेचा आणि परस्पर सन्मानाचा संदेश देणारा हा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गातील ही आगळीवेगळी वटपौर्णिमा राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, पत्नीच्या त्यागाचा गौरव करणारी ही परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Leave a Reply