
सध्या सूर्यकुमार यादवचा वाईट काळ सुरु आहे. त्याच्या बॅट मधून धावा निघत नाहीयत. त्याशिवाय टीम इंडियाच्या T20 कॅप्टनशिपवरुनही त्याला हटवलं जाणार आहे. आयपीएलचा सीजन सूर्यासाठी खूप वाईट ठरला. त्यात आता मुंबई T20 लीग मध्येही त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीयत. मुंबई T20 लीग मध्ये काल श्रेयस अय्यरच्या टीमने विजय मिळवला, तर सूर्याच्या टीमचा पराभव झाला. काल 4 जून रोजी या दोन्ही मॅच झाल्या. श्रेयस अय्यर SoBo मुंबई फाल्कन्स टीममध्ये आहे. त्याच्या टीमने MSC मराठा रॉयल्सला हरवलं. त्यानंतरचा सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ट्रिंफ नाईट MSC आणि वांद्रे ब्लास्टर्स संघामध्ये झाला.
आयपीएल 2026 चा सीजन संपल्यानंतर लगेचच T20 मुंबई लीग 2026 चा सीजन सुरु झालाय. श्रेयस अय्यरची टीम जिंकली. त्याचवेळी सूर्यकुमार यादवच्या टीमला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. आदित्य तारे SoBo मुंबई फाल्कंस टीमचा कॅप्टन आहे. श्रेयस या टीममध्ये आहे. त्यांनी MSC मराठा रॉयल्सला 3 विकेटने हरवलं. MSC मराठा रॉयल्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात SoBo मुंबई फाल्कंसने 5 चेंडू राखून 19.1 ओव्हरमध्येच तीन विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठलं.
श्रेयसच्या टीमचा हा पहिला विजय
श्रेयस अय्यरने 30 धावांचं योगदान दिलं. त्याने 125 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. T20 मुंबई लीग 2026 मध्ये श्रेयस अय्यरची SoBo मुंबई फाल्कंस टीम आतापर्यंत दोन सामने खेळली असून त्यांचा हा पहिला विजय आहे. पहिल्या सामन्यात ARCS अंधेरीने SoBo मुंबई फाल्कंसला 5 विकेटने हरवलं होतं. त्यात श्रेयस अय्यरचं योगदान फक्त 5 धावांचं होतं.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील दुसरा पराभव
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या ट्रिंफ नाईट MSC ला आपल्या दुसऱ्या सामन्यात वांद्रे ब्लास्टर्सकडून 4 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. ट्रिंफ नाइट MSC ने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 178 धावा केल्या. वांद्रे ब्लास्टर्सने विजयी लक्ष्य तीन चेंडू बाकी असताना गाठलं. त्यांनी 6 विकेट गमावून 19.3 ओव्हर्समध्ये 179 धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्रिंफ नाइट MSC चा हा दुसरा पराभव आहे. सूर्याने या मॅचमध्ये 6 चेंडूत फक्त 4 धावा केल्या. T20 मुंबई लीग 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ट्रिंफ नाइट MSC चा हा दुसरा पराभव आहे. याआधी 2 जूनला नॉर्थ मुंबई पँथर्स विरुद्ध 21 धावांनी पराभव झाला होता. त्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने फक्त 19 धावा केल्या होत्या.
Leave a Reply