• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shraddha Kapoor : टायटलचा वाद मिटला, आता ‘ईठा’ चित्रपट रिलीज होण्याआधी श्रद्धा कपूर एक महत्वाचं काम करणार

July 4, 2026 by admin Leave a Comment


श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच वाद सुरु झाला होता. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टायटलवर विठाबाई नारायणगांवकर यांच्या कुटुंबाने आक्षेप घेतलेला. आता हा वाद मिटला असून त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट केलय की, त्यांना टायटलवर काही आक्षेप नाही. त्यामुळे ‘ईठा’चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग थोडा सोपा झालाय. फिल्मच्या टायटलच्या वादावर तोडगा निघाल्यानंतर मेकर्सनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या रिलीज आधी संपूर्ण टीम नारायणगांवला जाणार असल्याची बातमी आहे. श्रद्धा कपूरही टीमसोबत असेल.

रिपोर्ट्सनुसार, डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी विठाबाई नारायणगांवकर यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. त्यांना समजावून सांगितलं की, बायोपिकचं नाव ‘ईठा’ का ठेवलं. कुटुंबाला लक्ष्मण उतेकर यांचं म्हणणं पटलं. आता त्यांना टायटलवर काही आक्षेप नाहीय. वाद मिटल्यानंतर आता श्रद्धा कपूर ‘ईठा’च्या रिलीजआधी विठाबाई यांच्या गावी नारायणगांवला भेट देणार आहे. मेकर्स ‘ईठा’ चित्रपटाचा प्रीमियर गावात करणार अशी सुद्धा चर्चा आहे.

विठाबाई यांच्या नातवाने काय सांगितलं?

विठाबाई यांचे नातू मोहित नारायणगांवकर यांनी सांगितलं की, 28 ऑगस्टला चित्रपट रिलीज होईल. त्याआधी श्रद्धा कपूर आणि चित्रपटाची टीम नारायणगांवला जाऊ शकते. मोहितला जेव्हा विचारलं की, चित्रपटाची टीम गावाला भेट चित्रपट रिलीज झाल्यानंतर देणार का? त्यावर त्याने रिलीज आधी भेट देणार असल्याचं सांगितलं.

सकारात्मक प्रतिसाद

‘ईठा’ चा पहिला प्रीमियर नारायणगांवमध्ये करण्याची मेकर्सनी विनंती केली आहे. नारायणगांवला ‘तमाशा’च तीर्थ स्थळ म्हटलं जातं. लक्ष्मण उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मोहितने सांगितलं. आमची टीम नारायणगांवला येईल असा त्यांनी विश्वास दिला आहे. श्रद्धा कपूरही येणार का? यावर मोहितने हो असं उत्तर दिलं. अजून काही फायनल झालेलं नाही. पण मेकर्स लवकरच माहिती देतील. या चित्रपटात श्रद्धा कपूर, रणदीप हुड्डा आणि मोहम्मद जीशान महत्वाच्या भूमिकेत आहेत. 28 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होईल.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे झाड म्हणजे सापांचं अंडे देण्याचं सर्वात आवडतं ठिकाण; चुकूनही घराच्या आसपास लावू नका, साप घरात घुसतील
  • पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय हवा? तूप आणि मनुका ठरेल फायदेशीर
  • पावसाचा फटका बॉलिवूडच्या बिग बींना, 50 कोटींच्या बंगल्यात शिरलं पाणी, घराबाहेर पडणं देखील झालं कठीण
  • भयंकर! बॉयफ्रेंडने रागाच्या भरात रॉकेल ओतून गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं, टॉप सिक्रेट ठरलं हत्येचं कारण
  • Chanakya Niti : हे लोक तुमचा विश्वासघात करणार म्हणजे करणार, चाणक्य काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in