• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shivsena Supreme Court Case Hearing : 2018 मधलं पक्षाचं संविधान लोकशाहीवादी नाही, शिंदेंच्या वकिलाचा मोठा दावा

September 2, 2026 by admin Leave a Comment


बहुचर्चित शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. सगळ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. कारण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक असेल. भविष्यातील राजकीय घडामोडींवर त्याचा परिणाम होईल. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला होता. आजपासून एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु झाला आहे. मुकुल रोहतगी, नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग हे शिंदे शिवसेनेची बाजू मांडत आहे. मुकुल रोहतगी खूप मोठं नाव आहे. ते भारताचे अटॉर्नी जनरल होते. त्याचवेळी इतर दोन वकिल माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर होते. त्यामुळे शिंदे गटाकडे सुद्धा वकिलांची तितकीच तगडी फौज आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त निकम यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यांनी अनेक निरुत्तर करणारे मुद्दे उपस्थित केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असेल? याची उत्सुक्ता आहे. ठाकरेंच्या दोन्ही वकिलांनी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना घेरणारा युक्तीवाद केला. हे प्रकरण महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 ते 2024 कार्यकाळातील आहे. पण पक्ष आणि निवडणूक चिन्ह याच्याशी संबंधित असल्यामुळे हा निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरेल.

शिंदेगटाच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे

1) एकनाथ शिंदेच्या पक्षाचे वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत.

2) सुभाष देसाई प्रकरणात आयोगाने जे सांगितले त्यानुसार झाले असे आम्हाल दिसते. आम्ही चुकूही शकतो, चुकलो तर दुरुस्त करा.

3) दाखल केलेल्या कागदपत्र व्यतिरिक्त मला काही मुद्दे मांडायचे आहेत.

4) 1999 पासून आयोग विविध पक्षांना पत्र लिहून सांगत आहे की पक्षात लोकशाहीवादी घटना असावी. घटनेनुसार निवडून आलेले लोक संघटनेत हवेत.

5) मात्र काही पक्ष हुकूमशाही सारखे आहेत, यात अनेक पक्ष असू शकतात.

6) 2018 मध्ये सादर केलेलं पक्षाचं संविधान लोकशाहीवादी नाही.

7) ठाकरे गटाचं अवलंबित्व केवळ त्यांनी पाठवलेल्या काही पत्रांवर आहे.

8) 2018 च्या संविधानात अनेक लोकांच्या नियुक्त्या केल्या आहेत, ते लोक निवडून आलेले नाहीत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shivsena Symbol Dispute : एकनाथ शिंदेंनी पक्षातून बंडखोरी का केली? शिवसेना शिंदे गटाच्या वकिलाचा सुप्रीम कोर्टात थेट मोठा दावा
  • शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
  • ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग….
  • एसीरुम या वस्तू ठेवण्याची कधीही चूक करु नका, एकदा कारण नक्की घ्या जाणून
  • रवींद्र जडेजा सर जेफरी बॉयकॉट यांचा लाडका! आवडता खेळाडू असण्याचं कारण काय? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in