• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shilpa Shinde : जे उखडायचं ते उखडा… शिल्पा शिंदेचा रौद्रावतार; ट्रोलर्सवर भडकली

June 6, 2026 by admin Leave a Comment


भाबीजी घर पर है या सीरिअलमधील अंगूरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे सध्या एका मोठ्या वादात सापडली आहे. एका निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा खोटा आरोप केल्याचं तिने एका मुलाखतीत कबूल केलं आहे. त्यामुळे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने तिच्या या खुलाश्याची गंभीर दखल घेऊन तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे पदाधिकारी एवढ्यावर थांबलेले नाहीत तर या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाहीर विनंती केली आहे. शिल्पा शिंदेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. त्यामुळे शिल्पाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ट्रोलर्सने तिला बेजार केलं असून त्यांच्यावरही तिने आपला सर्व राग काढला आहे.

चारही बाजूने कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता बळावली तरी शिल्पाचा तोरा काही कमी झालेला नाही. तिने सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक पोस्ट केली आहे. ज्यांना जे उखडायचं ते उखडा. मला काही फरक पडत नाही, असं म्हणत तिने खुलं आव्हानच दिलं आहे. तसेच ट्रोलर्सचाही तिने अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे.

शिल्पाची पोस्ट व्हायरल

चारही बाजूने कोंडी होऊन सुद्धा शिल्पामध्ये काहीच फरक पडलेला नाही. तिने कोणत्याही प्रकारची शरणागती पत्करलेली नाही. उलट तिने आज इन्स्टावर एक रिल आणि काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने स्वत:चा बचाव करताना अत्यंत आक्रमकपणे पोस्ट लिहिली आहे. एक महिला बना आणि नेहमी जे उखडायचं ते उखडा, म्हणण्यासाठी तयार राहा, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमधून तिने तिच्या विरोधकांचाही समाचार घेतला आहे. जळणाऱ्यांनी जळत राहावं. तुमचं रक्त एखाद्या गरजूंना देऊ नका. ते जाळूनच खतम करा, असा हल्लाच तिने चढवला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shinde (@shilpa_shinde_official)

त्यावरही बोलली

या पोस्टनंतर शिल्पाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. तुमचं पीआरचं काम करत राहा. पण या प्रकरणाबाबत खोटी माहिती पसरवणं थांबवा. लैंगिक शोषणाचा अर्थ म्हणजे कोणीही कुणाशी इच्छा नसताना लैंगिक संबंध ठेवणं, त्यामुळे समोरची व्यक्ती असहज होते. घाबरते, तिला अपमानित झाल्यासारखं वाटतं आणि वाईट वाटतं. मर्जीशिवाय शारीरिक संपर्क, लैंगिक भाष्य आणि मस्करी, चुकीचे मेसेज किंवा फोटो वा वारंवार इच्छा नसताना केलेले प्रयत्न आणि लैंगिक भावना जागरूक करणारे इशारे… त्यामुळेच मनाचं काहीबाही पसरवणं बंद करा. ग्राहकांनो जागे व्हा… असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

असोसिएशनची चिंता

दुसरीकडे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. भाबीजी घर पर हैचे निर्माते संजय कोहली यांच्यावर प्रसिद्धीसाठी किंवा वाद वाढवण्यासाठी लैंगिक शोषणाचा खोटा आरोप करणं संपूर्ण बॉलिवूड आमि टीव्ही इंडस्ट्रीसाठी अत्यंत चिंताजनक आहे, असं असोसिएशनने म्हटलं आहे.
री में यह कदम उठाया था.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in