• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shatrughan Sinha : अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठे स्टार असते शत्रुघ्न सिन्हा, दोन निर्णय चुकल्याचा आजही पश्चाताप

June 11, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये काही हिरोंनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. आजही प्रेक्षक त्यांना त्यांच्या खास शैलीमुळे लक्षात ठेवतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. अभिनय आणि डायलॉगमुळे शत्रुघ्न सिन्हा यांना आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. 1969 साली ‘साजन’ चित्रपटाद्वारे शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपट सृष्टीतील टॉप अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. शत्रुघ्न सिन्हा आपल्या करिअर अशा दोन चित्रपटांना नकार दिला, त्या बद्दल त्यांना आजही पश्चाताप होतो. स्वत: शत्रुघ्न सिन्हा यांनी याची कबुली दिली होती. करिअर चांगल्या उंचीवर असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी दीवार आणि शोले सारख्या चित्रपटांना नकार दिला होता. हे चित्रपट त्यांनी केले असते, तर कदाचित अमिताभच्या जागी तेच मोठे स्टार बनले असते.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या अनेक चाहत्यांना आज असं वाटतं की, त्यांनी शोले आणि दीवार सारखा चित्रपट केला असता, तर ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठे स्टार असते. पण या बद्दल शत्रुघ्न सिन्हा स्वत: कधी काही बोलले नाहीत. चित्रपटाला नकार दिल्यानंतर होणाऱ्या पश्चातापाबद्दल नक्की बोलले होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी शोले का नाकारला?

शोले आणि दीवार या दोन फिल्म अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील सर्वात मोठे हिट चित्रपट आहेत. करिअरचा टर्निंग पॉइंट म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या दोन चित्रपटांनी अमिताभ यांच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. एकदा आज तकशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, रमेश सिप्पी यांनी आधी अमिताभचा रोल त्यांना ऑफर केला होता. पण त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे अनेक चित्रपट होते. डेट्सचा प्रॉब्लेम होता. म्हणून त्यांनी नकार दिला.

अमिताभ बच्चन यांच्यासाठी दाखवला मनाचा मोठेपणा

रमेश सिप्पी मला चित्रपटांच्या तारखांबद्दल सांगत नव्हते. मी माझ्या सर्व तारखा शोले साठी द्याव्यात असं त्यांचं म्हणणं होतं. पण शत्रुघ्न त्यासाठी तयार झाले नाहीत. चित्रपट त्यांच्या हातातून गेला. एका इंटरव्यूमध्ये शत्रुघ्न म्हणाले की, मला तो चित्रपट करायला हवा होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी मनाचा मोठेपणा दाखवत अमिताभ बच्चन यांच्यासाठी समाधान व्यक्त केलं होतं. या चित्रपटाने अमिताभना नॅशनल आयकॉन बनवल्याचं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

आजही त्यांना पश्चाताप होतो

शत्रुघ्न सिन्हा यांनी इंटरव्यूमध्ये दीवार चित्रपट रिजेक्ट करण्याचाही किस्सा सांगितला. या चित्रपटात अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये होते. दीवारने अमिताभ यांची एंग्री यंग मॅनची ओळख दिली. ते सुपरस्टार बनले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मला दीवार ऑफर झालेला. पण मी हा चित्रपट करु शकलो नाही. ही सुद्धा चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं. मी नकार दिला, पण मला याचा आनंद आहे की, हा चित्रपट माझा मित्र अमिताभ बच्चन यांनी केला. शत्रुघ्न सिन्हा यांनी हे सुद्धा सांगितलं की, मी आजपर्यंत शोले आणि दीवार हे चित्रपट पाहिलेले नाहीत. कारण हे चित्रपट नाकारण्याचा आजही त्यांना पश्चाताप होतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in