• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shashank Singh: पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या शशांक सिंहवर नोकराचे गंभीर आरोप, मारहाण आणि…

June 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत आक्रमक फटकेबाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडणारा शशांक सिंह वैयक्तिक आयुष्यात अडचणीत आला आहे. नोकराने मारहाण केल्याचा आरोप केल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. शशांक सिंह विरुद्ध भोपाळमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीत मारहणीसह इतरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विपेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने तक्रार नोंदवत पोलिसांना सांगितलं की, शशांक सिंह आणि त्याच्या घरच्यांनी मारहाण केली. इतकंच काय तर सरकारी नोकरी देण्याचं आमिष दाखवून भोपाळमध्ये बोलवलं होतं. त्यानंतर घरी जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडलं. या आरोपानंतर क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. शशांक सिंहने खरंच असं केलं का? वगैर प्रश्न अनेक जण सोशल मीडियावर विचारत आहेत.

पीडित विपेंद्र सिंहने काय सांगितलं?

विपेंद्र सिंहने मीडियाशी वार्तालाप करताना सांगितलं की, ‘माझ्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतलं जात होतं. मला सरकारी नोकरीचं आमिष दाखवून भोपाळमध्ये बोलवलं आणि त्यानंतर माझा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. मी नकार दिल्यावर संपूर्ण कुटुंबाने मला जनावरासारखी मारहाण केली.’ विपेंद्र सिंहच्या आरोपानंतर शशांक सिंह, त्याचे वडील शैलेश सिंह आणि ड्रायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश सिंह हे निवृत्त आयपीएस अधिकारी आणि शशांक सिंह आयपीएलमधील एक प्रमुख खेळाडू आहे.

#WATCH | Bhopal: Vipendra Singh Tomar, who has accused cricketer Shashank Singh and his family of assault, says, “Shailesh Singh (father of Shashank Singh) is a retired IAS; I had gone there to cook. I arrived on June 25. After observing their behavior, I refused to work. They… https://t.co/KFT9AR5FIA pic.twitter.com/YXDYwCx9jD

— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 30, 2026

काय म्हणाला शशांक सिंह?

आरोपांना उत्तर देताना शशांकने ते दावे खोडून काढले आहेत. शशांक म्हणाला की, “तसे काहीही घडले नाही. 25 तारखेच्या संध्याकाळी येऊन 28 तारखेच्या सकाळी निघून जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओलीस ठेवणे कसे म्हणू शकता?” तसेच शशांकने पुढे सांगितलं की, “तो घरात घुसला आणि बेडरूमचे व्हिडिओ रेकॉर्ड करू लागला. महागड्या आणि आलिशान वस्तू ठेवलेल्या बेडरूममध्येही तो शिरला, तिथे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इतर लोकांना पाठवले,”

शशांक सिंहचं क्रिकेट कारकिर्द

शशांक सिंहने आयपीएलमध्ये आतापर्यंत 53 सामने खेळले आहेत. त्यात 36.2 च्या सरासरीने 905 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 160 पेक्षा अधिक आहे. पंजाब किंग्सचा बेस्ट फिनिशर म्हणून त्याची ख्याती आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगडकडून खेळतो. शशांकने 24 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने, 35 लिस्ट ए सामने आणि 1110 टी20 सामने खेळले आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘लग्नानंतरही पार्टनरने चीट केले तर त्याला चूक समजू नका, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे खळबळजनक विधान
  • रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले संपूर्ण बजेट, चित्रपटाने रचला होता इतिहास
  • मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
  • सुपरस्टार हिरो, 13 वर्षांच्या मुलीचं भरदिवसा अपहरण! रिक्षात ओढलं, हॉटेलमध्ये नेलं अन्… पुढे थरकाप उडवणारं घडलं!
  • मुंबईत भयंकर अनर्थ! मोठं झाड स्कुल बसवर कोसळलं, एका चिमुकल्याचा मृत्यू, 10 मुलं गंभीर, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in