• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sharad Pawar | शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही, त्याआधी…

September 3, 2026 by admin Leave a Comment


विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या असून, त्या मागण्यांसंदर्भात सरकारने स्वीकारलेले धोरण योग्य आहे का, याबाबत न्यायदेवतेने स्पष्ट भूमिका मांडल्याचे पवार यांनी म्हटले. “तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेतले नाहीत, तर आम्हाला निर्णय घ्यावे लागतील,” असा कडक शब्दांत न्यायालयाने सरकारला सल्ला दिल्याचे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरही शरद पवार यांनी भाष्य केले. या प्रकरणाची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने निकालापूर्वी कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “कोर्टाचा निकाल येईल. सुनावणी चालू आहे, संपलेली नाही. त्याआधी आम्ही भाष्य करणं दोघांच्या हिताचं नाही. काय असेल ते कळेल,” असे पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य बारामती दौऱ्याबाबतही शरद पवार यांनी माहिती दिली. मोदी बारामतीत येणार असल्याचे सांगण्यात आले असून, 16 ऑक्टोबर ही संभाव्य तारीख असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांना बारामतीशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयाचे प्रेझेंटेशन देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. यापूर्वी सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नावेळी काही लोकांनी पंतप्रधानांना प्रेझेंटेशन दिले होते आणि त्याबाबत त्यांना सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्याचे पवार म्हणाले.

साखरेच्या वाढलेल्या दरांवरही शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. साखरेचे दर वाढले असले तरी त्याचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले. उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे, त्यामुळे शेतकरी जो माल पिकवतो त्यातील योग्य हिस्सा त्याला मिळाला पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली.

तसेच, साखरेची आयात करण्याच्या निर्णयावरही शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. “साखर आयात करणं योग्य नाही. नवीन आयात केलेल्या साखरेचा फायदा कधी मिळणार हे सांगता येत नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे साखरेचे दर, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि आयातीचा निर्णय या मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर
  • 1994पासून आजपर्यंत काय करताय? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं स्पष्ट मत, एका विधानानेच…
  • ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी विश्वविक्रमासाठी सज्ज
  • सामान्य गाड्यांपेक्षा EV चे टायर लवकर गुळगुळीत का होतात? ‘हे’ कारण तुम्हाला माहीत आहे का? अशी घ्याल काळजी
  • Swara Bhasker: स्वरा भास्करची जीभ छाटणाऱ्याला 1.51 लाखांचं बक्षीस; ‘जौहर’च्या वक्तव्यावरून संतापाचा उद्रेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in