• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sharad Pawar: नेहरू आणि मोदींची तुलनेवर शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य… कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन

June 10, 2026 by admin Leave a Comment


Sharad Pawar on Pandit Nehru And PM Narendra Modi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाला. तेव्हा पवार यांनी अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांनी यावेळी काँग्रेस, नेहरू आणि गांधी घराण्याचे देशासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला. तर दोन्ही नेत्यांची तुलना होऊ शकत नाही असे स्पष्ट केले.

सत्ता असो वा नसो त्याची चिंता नाही

आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम. मला मोठी गंमत वाटली. पक्षाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर जाहिरात पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत किती असते मला माहित आहे. त्यामुळे मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण आज जाहिरात पाहिली नाही असे शरद पवार म्हणाले.

तुमची उपस्थितीत पाहिली तर ही जाहिरात सर्वांसाठी आहे. त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. आज वर्धापन दिन आहे. सत्ता असो नसो, त्याची चिंता तुम्ही कधी केली नाही. अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात दिला. आपण सत्ता असली की सत्तेत काम करतो. नसेल तर लोकांमध्ये काम करतो, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवा

प्रश्न खूप आहेत. देशाच्या समस्या आहेत. सुशिक्षित बेकार असेल, आदिवासी, महिला, अल्पसंख्या या घटकांच्या समस्यांनी देशात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नावर किती आस्था आहे, त्यावर भाष्य न केलेलं बरं. काही लोक काही दिवस सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशात असा एखादा नेता झालाच नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. प्रधानमंत्रीपद संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं हे भारतीयाचं काम आहे. धोरणात्मक गोष्टी आम्ही मांडू. पण धोरणात्मक पदाची प्रतिष्ठा आम्ही ठेवत असतो. त्याचा अनादर करत नाही. पण गंमत वाटते, आज दोन गोष्टी पाहण्यात आल्या. एकावेळेस त्यांनी आजच्या नेतृत्वाची तुलना जवाहरलाल नेहरूंशी केली. ठिक आहे. तुम्ही पंतप्रओधान झाली. त्यांना इतकी वर्ष मिळाली. त्याचं महत्त्वं आहे. पण ही स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? ही स्पर्धा नेहरू असताना सांगण्याचा प्रयत्न हा आहे की नेहरू जितके दिवस पंतप्रधान होते. मोदीही तितके काळ आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांना अधिक काळ मिळावा हे त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल तर वावगं नाही.

नेहरूंचा काळ, त्यांचं कर्तृत्व आणि योगदानाशी त्यांची तुलना होऊ शकते का. पंतप्रधान होण्या आधी नेहरूंनी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचं काम केलं. मोलाची कामगिरी केली. हा इतिहासाचा भाग आहे. हे विसरू शकत नाही. नेहरू सुविद्य गृहस्थ होते. संघर्ष करणारे होते. स्वातंत्र्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले. संघर्ष केला. गांधींच्या नेतृत्वाखाली. शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळख झाली. यात नेहरूंची कामगिरी मोठी होती. ती विसरता येणार नाही.

एक गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील एक मंत्री काल शीख समाजाच्या कार्यक्रमाला गेले. ते गेले त्याबद्दल काही म्हणायचं नाही. त्यांनी जे भाषण केलं. ते हस्यास्पद होतं. त्यांनी फार मोठी टिका टिप्पणी केली. त्यांनी इंदिरा गांधींवर टीका केली. इंदिरा गांधींनी या देशाला स्वातंत्र्यानंतर संघटित केलं. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. त्या महान व्यक्ती होत्या. इंदिरा गांधींनी देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत… पहिली प्रतिक्रिया समोर
  • IND vs IRE : टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचं आयर्लंड विरुद्ध होणार खास डेब्यू, 9 क्रिकेटपटूंबाबत काय?
  • उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, एकनाथ शिंदेंनी थेट नगराध्यक्ष फोडला; असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
  • मोठी बातमी! एक मोठी चूक झालीच, 6 बडंखोर खासदार होणार अपात्र? ठाकरेंनी फिरवला गेम, आता थेट…
  • Photos : पाकिस्तानी महिला क्रिकेटरची हवा, सौंदर्याचे जगभर दिवाने, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in