• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Scam 2010: ‘स्कॅम 2010’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; साकारणार सुब्रत रॉय यांची भूमिका

August 12, 2026 by admin Leave a Comment

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या 'स्कॅम' फ्रँचाइजीमधील नव्या वेब सीरिजचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'स्कॅम 2010' असं या सीरिजचं नाव असून ही दिवंगत उद्योगपती आणि सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्यावर आधारित आहे. तमाल बंदोपाध्याय यांच्या 'सहारा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे.

या वेब सीरिजमध्ये सुब्रत रॉय यांची मुख्य भूमिका एक मराठमोळा अभिनेता साकारत आहे. या पोस्टरमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सिद्धार्थ बोडके आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' 'दृश्यम' 'देवमाणूस' यांसारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ आता या हिंदी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

या वेब सीरिजमध्ये सुब्रत रॉय यांची मुख्य भूमिका एक मराठमोळा अभिनेता साकारत आहे. या पोस्टरमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सिद्धार्थ बोडके आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले', 'दृश्यम', 'देवमाणूस' यांसारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ आता या हिंदी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

 एका साम्राज्याच्या उदयाची आणि त्याला अजिंक्य समजणाऱ्या माणसाची रंजक कथा यात पहायला मिळणार आहे. सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री तितिक्षा तावडेनंही हा पोस्टर शेअर करत 'let's go' असं लिहिलं आहे. हंसल मेहता यांनी याआधी 'स्कॅम 1992' आणि 'स्कॅम 2003' हे सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते.

या सीरिजबद्दल सिद्धार्थ म्हणाला यातील मुख्य पात्राच्या व्यक्तिमत्त्वाची गुंतागुंत आणि सीरिजचा आवाका पाहून मी थक्क झालो. जिद्द शक्ती उणिवा आणि पतन यांमुळे हे पात्र साकारण्याचा अनुभव खूपच रोमांचक होता. सिद्धार्थला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

या सीरिजबद्दल सिद्धार्थ म्हणाला, “यातील मुख्य पात्राच्या व्यक्तिमत्त्वाची गुंतागुंत आणि सीरिजचा आवाका पाहून मी थक्क झालो. जिद्द, शक्ती, उणिवा आणि पतन यांमुळे हे पात्र साकारण्याचा अनुभव खूपच रोमांचक होता.” सिद्धार्थला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये सहारा इंडिया परिवार या उद्योगसमूहाची सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारल्याबद्दल सेबीने त्यांची चौकशी केली. त्यानंतर हा खटला देशभरात चर्चेत आला. 2014 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. प्रकृतीच्या समस्यांशी झुंज देताना सुब्रत रॉय यांचं नोव्हेंबर 2023 मध्ये निधन झालं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in