• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Saudi Arabia : जगासाठी वाईट बातमी, सौदी अरेबियाचं काही खरं नाही, इराण बाजूला राहिला दुसऱ्या देशाने बदला घेण्याची शपथच घेतली

July 13, 2026 by admin Leave a Comment


आखातामध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेने इराणच्या सैन्य तळांवर हल्ले केल्यानंतर इराणने सुद्धा आखातामधील अमेरिकन तळ हादरवून सोडले. आधीच या युद्धामुळे जग टेन्शनमध्ये असताना आता आणखी दोन देशांमध्ये भीषण युद्ध भडकण्याची दाट शक्यता आहे. सौदी अरेबियाच्या एअरफोर्सने राजधानी सनाच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला टार्गेट करताना जोरदार हवाई हल्ले केले. येमेनमधील हूती बंडखोरांनी हा आरोप केलाय. सौदी अरेबियाने सना इंटरनॅशनल एअरपोर्टला टार्गेट केलं. आता तणाव कमी करण्याची वेळ निघून गेलीय. या हल्ल्यासाठी सौदी अरेबिया पूर्णपणे जबाबदार आहे असं हूती सैन्याचा प्रवक्ता याह्या सरीने म्हटलं आहे.

आम्ही या हल्ल्याला उत्तर देणारचं. शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही असं सरीने सांगितलं. या संपूर्ण प्रकरणात येमेन सरकारची बाजू सुद्धा समोर आली आहे. इराणच्या एका विमानाला तिथे उतरण्यापासून रोखण्यासाठी आम्ही हा हल्ला केला असं येमेन सरकारचं म्हणणं आहे. येमेनची राजधानी इराण समर्थित हूती बंडखोरांच्या ताब्यात आहे. सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशांचं समर्थन असलेलं सरकार दक्षिण किनाऱ्यावरील अदनमध्ये आहे.

बदला घेण्याची शपथ

कुठलाही पुरावा न देता हूती बंडखोरांनी बदला घेण्याची शपथ घेतली आहे. त्यासाठी सौदी अरेबियाला दोषी धरलं आहे. सौदीची विमानं येमेनच्या एअर स्पेस मध्ये घुसली होती. त्यांनी इराणी विमानाला थांबवण्याचा प्रयत्न केला. प्लेनमध्ये 200 पेक्षा जास्त जखमी, आजारी आणि फसलेले येमेनी नागरिक होते असं हूती बंडखोरांचं म्हणणं आहे.

सर्वकाही बदलू शकतं

अलीकडच्या काही वर्षात येमेनमध्ये हूती बंडखोर आणि सौदी समर्थित सरकारमध्ये संघर्ष काही प्रमाणात कमी झाला होता. पण या नव्या हल्ल्यामुळे सर्वकाही बदलू शकतं. या क्षेत्रात तणाव कमी करण्याचे प्रयत्न करुन फार काही उपयोग होणार नाही. तिथल्या लोकांच्या मनात भितीची भावना आहे.

विविध आजारांचा सामना

सनाच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उड्डाणांची संख्या आधीच कमी होती. या हल्ल्यानंतर एअरपोर्ट आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना औषधं, भोजन आणि मदत पोहोचवणं कठीण बनलय. येमेन आधीपासून जगातील सर्वात खराब मानवी संकटाचा सामना करत आहे. लाखो लोक तिथे उपासमारी आणि विविध आजारांचा सामना करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टूथब्रशवरुन शोधून काढलं पत्नीचं सिक्रेट अफेअर, 15 लाख, केस जिंकला पण एक अशी चूक केली त्यामुळे उलट तोच गेला तुरुंगात
  • रक्षाबंधनानिमित्त सलमान खान बहिण अलवीराच्या घरी; आई हेलेनही सोबत, व्हिडीओ व्हायरल
  • पंतप्रधान मोदी यांनी लहानग्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन, छोट्यांच्या केल्या गप्पा-टप्पा
  • IMD Weather Update : नवं संकट! समुद्रात तयार झालं भयानक वादळ… महाराष्ट्रासह 13 राज्यांना पावसाचा अलर्ट
  • गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे… मुरलीधर मोहळ यांचे गणेश मंडळाबाबत मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in