• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sarfaraz Khan Post: भारतीय संघात कमबॅक होताच सर्फराज खानची पोस्ट चर्चेत, फोटोमध्ये खास व्यक्तीसोबत दिसला

August 10, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने सराव सामना खेळला होता. आता या मालिकेपूर्वीच भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतींचा सामना करताना पाहायला मिळाले. आता या खेळाडूंची रिप्लेसमेंटही बीसीसीआयने जाहीर केली आहे. साई सुदर्शन हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. आता साईची रिप्लेसमेंट म्हणून सर्फराज खानचे नाव बीसीसीआयने घोषित केले आहे. आता सर्फराज खान श्रीलंका दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात परतला आहे. दुखापतीमुळे बाहेर झालेल्या साई सुदर्शनची जागा त्याने घेतली आहे. दरम्यान, भारतीय संघात परतल्यानंतर सर्फराज खान उत्साही दिसला आणि त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

सर्फराजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय संघाची ट्रॅव्हलिंग जर्सी घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्याचे वडीलही त्याच्यासोबत दिसत आहेत. सरफराजने सनग्लासेस घातले आहेत, जे त्याचा रुबाब स्पष्टपणे दर्शवते. मात्र, त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन दिले नाही, फक्त इमोजी शेअर केले.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करणारा सरफराज खान भारतासाठी शेवटचा 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. सरफराज खानने भारतीय संघासाठी एकूण सहा कसोटी सामने खेळले असून 372 धावा केल्या आहेत. सर्फराजची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीही भारतीय संघात निवड झाली होती, परंतु तो एकही सामना खेळला नाही. सर्फराज इंग्लंड दौऱ्यावर भारत ‘अ’ संघाचाही भाग होता, परंतु जून-जुलै 202t मध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याला मुख्य भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

या अडचणी असूनही, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आणि राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या शर्यतीत तो कायम राहिला. भारत ‘अ’ संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान साई सुदर्शनच्या अंगठ्याला दुखापत झाली. तो सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये उपचार घेत आहे. सुदर्शनच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने म्हटले आहे की, तो लवकर बरा होत असून वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

श्रीलंकेविरुद्ध अद्ययावत भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिकल, सारांश जैन, आकिब नबी, सर्फराज खान.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in