• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut: तोड के दिखाऐ… संजय राऊत पत्रकार परिषदेत गरजले, तुम्हाला धडा शिकवूनच… थेट इशारा

June 18, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Raut Big Warning to Rebels: फुटीर खासदारांनी कालपासून उद्धव सेनेचे टेन्शन वाढवले आहे. तर आता थोड्याच वेळापूर्वी उद्धव सेनेच्या खासदारांची बैठक सुरू होत आहे. त्यापूर्वी खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर अचूक निशाणा साधला. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करत बंडखोरी करणाऱ्यांना थेट मॅसेज दिला. या पत्रकार परिषदेत संजय राऊत गरजले. काय दिलात त्यांनी बंडखोरांना इशारा?

राऊतांचा मिश्किल टोला

अनेकांना फोनवर निरोप दिला. व्हॉट्सअपवरही मेसेज दिला आहे. व्हीप जारी केला आहे. तुम्ही ज्या बातम्या दाखवत आहात त्यावरून आमच्याकडे ९ खासदार आहेत, ते १५ होतील असं वाटतंय, असा मिश्किल टोला संजय राऊत यांनी लगावला. आम्ही बैठकीला जात आहोत. उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. त्यांनी माहिती घेतली. चर्चा केली. सूचना केल्या. ही रेग्युलर प्रोसेस आहे. यापूर्वीही अशा प्रकारचा व्हीप जारी करण्यात आलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व खासदारांना बजावला व्हीप

अरविंद सावंत यांनी व्हीप जारी केला आहे. आज महत्त्वाची बैठक आहे. पार्लमेंट ऑफिसमध्ये मिटिंग आहे. काही विषयावर चर्चा करायची आहे. तीन ओळीचा व्हीप आहे. आज आम्ही ११ वाजता बसणार आहोत. किती खासदार दिल्लीत आहे हे माहीत नाही. किती पोहोचले माहीत नाही. पण आम्ही सर्वांच्या घरी व्हीप पाठवला आहे. मेल करणं, व्हॉट्सअप करणं आणि हातात व्हीप देणं ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

तर या पत्रकार परिषदेत फुटीर खासदारांवर संजय राऊत गरजले. ज्या लोकांचं नाव तुम्ही घेत आहे. यांना फोडणार, त्यांना फोडणार. एकदा त्यांनी केलं आहे. आता मी म्हणतो फोडूनच टाकवा. आता तुम्हाला नाही फोडणार ना, शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही. हा खेळ आहे का. पैशाची मस्ती आली का. ईडी सीबीआयची धमकी कुणाला दाखवणार. आम्ही जेलमध्ये गेलो होतो. परत जाऊ. पण तुम्हाला धडा शिकवूनच जाऊ, असा इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in