• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut: ते आम्हाला पाहत होते, नजरेची टक्कर होत होती, पण न्याय… शिवसेना पक्ष आणि चिन्हावर संजय राऊतांचा टोला, सुनावणीदरम्यान घडलं काय?

August 5, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर अधिकार कुणाचा हा पेच अजून सुटलेला नाही. सुप्रीम कोर्टात काल याविषयावर सुनावणी होती. कालच्या सुनावणीदरम्यान काय घडलं, याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आज या खटल्यात दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी राऊतांनी या घडामोडींवर मिश्किल टिप्पणी केली. तर राज्यात कालपासून गुंगी गुडिया या शब्दावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सल्ला दिला. त्यावर मोठे भाष्य केले.

गुंगी गुडियावर राऊतांचे भाष्य

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतीत गुंगी गुडिया अशी टीका केली आहे, त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थित खुलासा केला आहे, असे मला वाटते. सुनेत्राताई या राजकारणात नवीन असल्या तरी, त्यांच्या माहेरी आणि सासरी राजकारण आहे. हळूहळू त्या राजकारणात स्थिरावतील. पण ज्या पद्धतीने बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी मौन बाळगले. त्यावर काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. बीड जिल्ह्यातील नेते, धनंजयराव मुंडे हे त्यांच्या बाजूला होते. हा प्रश्न त्यांच्यासंदर्भात होता. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी भाष्य करणे योग्य ठरलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांचा ताबा घेतल्याचे मी ऐकले. पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या. त्या जागी जर एखादा पुरूष मंत्री असता. एकनाथ शिंदे अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते. तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटल्या गेलं असतं, अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली.

आता मौन नको, उत्तर द्या

आपण राजकारणामध्ये आहोत, आपण टीका सहन करायला हवी. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी देण्यात आली होती. पण इंदिराजींनी हे सिद्ध केलं की त्या गुंगी गुड्डिया नाहीत .यामध्ये स्त्री आणि पुरूष असा भेद करणे योग्य नाही. घटनात्मक पदावर आपण आहोत. अत्यंत संयमाने आपण भाष्य करणे हे गरजेचे असते. सुनित्राताई यातून नक्कीच शिकतील. माझ्या भाषेविषयीचा प्रश्न तुम्ही कोणाकडे काढत आहात? गुंगी गुड्डिया हा असंवैधानिक शब्द नाही. हा नेहमीतील वापरातील शब्द आहे. त्यांना बारामतीत घरी जाऊन कोणी प्रश्न विचारला नाही. त्यांनी घटनात्मक पदाची शपथ घेतली आहे. त्या बीडच्या पालकमंत्री आहे. त्यांना बीडच्या कायदा आणि सुरक्षेवरती प्रश्न विचारला असेल तर त्यामागील राजकीय पक्षाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा असे प्रश्न विचारले जाईल, तेव्हा सुनेत्राताईंनी त्यावर मौन बाळगू नये. त्यांनी उत्तर द्यावे. त्या ठिकाणी धनंजयराव मुंडे असते आणि त्यांना असा प्रश्न विचारला असता तर कदाचित अशीच प्रतिक्रिया आली असती, असे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी हा जो त्यांचा पक्ष आहे, तो अमित शाह यांचा पक्ष आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. अमित शाह हे सध्या लपून बसलेले आहेत. जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीमार झाला. पॅलेट गन वापरल्या गेला. त्यावर ते मौन बाळगून आहेत. म्हणजे ते गुंगा गुड्डा आहेत. मोदीही गुंगा गु्ड्डा आहेत. गृहमंत्री जोपर्यंत जोपर्यं जंतरमंतरवरील लाठीचार्ज, टिअर गॅस आणि पॅलेट गन याच्या वापराचे आदेश कोणी दिले हे सांगत नाहीत, राम मंदिर दान पेटी लुटीचा प्रश्न गंभीर आहे. हा विषय दोन्ही सभागृहात आहे, त्यावर पंतप्रधान मोदी यांना उत्तर द्यावे लागेल. तोपर्यंत संसदेचे कामकाज होणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्ट सुनावणीवर चिमटा

काल आम्ही दिवसभर सुप्रीम कोर्टात बसून होतो. मुख्य न्यायाधीशांसमोर आमचे हसरे चेहरे दाखवत बसून होतो. तेही आम्हाला पाहत होते, आम्ही त्यांना पाहत होतो. नजरेची टक्कर होत होती. पण न्याय काही मिळत नव्हता. 36 वा क्रमांक होता आमच्या खटल्याचा. 35 वा खटला सुरू होणार तोच कोर्ट उठलं, आम्हाला आश्चर्यच वाटलं. बुंदी आता आमच्या ताटात कधी पडेल ते आम्ही बघू. पण त्यानंतर कपिल सिब्बल, देवदत्त कामत, असीम सरोदे हे आमची सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहेत. सिब्बल यांनी सांगितले की आजही आम्ही आमचा युक्तीवाद करायला तयार आहोत. कोर्टाने आज दुपारी 2:30 वाजता आम्हाला सुनावणीसाठी वेळ निश्चित केली आहे. कोर्ट आज आमचा युक्तीवाद ऐकणार आहे. आज परत जाऊन आम्ही समोर बसू.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in