• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanchita Ugale Death : ‘ ए बबडू उठ ना.. संचू उठ ना गं.. मला आई म्हण ना..’ संचिताच्या पार्थिवाशेजारी आईचा आक्रोश, हदय हेलावणारी हाक, Video

June 16, 2026 by admin Leave a Comment


‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ या मालिका तसेच विक्की कौशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ सिनेमात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यूमुळे टीव्ही क्षेत्रात तसेच चित्रपटसृष्टीत प्रचंड खळबळ माजली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास संचिता हिने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. अवघ्या काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू करणारी संचिता अल्पावधीत लोकप्रिय झाली. तिचे अने चाहते होते, नवंनवं काम करून, आव्हानं पेलून तिला करिअमध्ये आणखी प्रगती करायची होती. मोठा टप्पा गाठत नाव कमवायचं होत, पण त्याआधीच या प्रतिभा संपन्न अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट झाल्याने सगळेच हादरले अन् हळहळले देखील.

सोमवारी दुपारी संचिताच्या आत्महत्येची बातमी समोर आली आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला. नालासोपारा येथे ती , आई- वडील आणि बहिणीसोबत रहायची. मात्र रविवारी संध्याकाळी घरी कोणीही नसतान तिने टोकाचं पाऊल उचललं. बेडरूमधील पंख्याला गळफास लावून घेत तिने तिचं अनमोल आयुष्य संपवलं. बहीण घरी आल्यावर तिला हा धक्कादायक प्रकार समजला. कुटुंबियांच्या , शेजाऱ्यांच्या मदतीने तिने संचिताला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. मात्र संचिताने हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाही, पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मला आई म्हण ना.. ए बबड्या … तू का असं केलं ? संचिताचा मृतदेह पाहून आईचा आक्रोश

संचिताच्या मृत्यूमुळे बॉलिवूडही हादरलं. तिच्या अंत्यसंस्कारादरम्यानचे काही क्षण व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले असून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. तिचा मृतदेह जमिनीवर ठेवलेला होता आणि तिची आई, बहीण, नातेवाईक शेजारी उभे होते. आपली लाडकी लेक या जगातून गेली, हे त्या माऊलीला पटतंच नव्हतं, ती आई संचिताला सतत हाक मरात होती, उठवत होती.

ए बबडू उठ ना..

” ए संचू.. संचिता उठ ना.. मला आई म्हण ना.. ए बबड्या … तू का असं केलं हे ? माझ्यासोबत राहणार होतीस ना तू.. असं का केलं हे ?” रडत रडत, हंबरडा फोडत, संचिताच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, तिच्या आईने विचारलेल्या या प्रश्नांनी तिथलं वातावरण आणखीनच गंभीर झालं. संचिताचा मृतदेह पाहून कोणाचाच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिची आई, बहीण, नातेवाईक यांच्या डोळ्यातीलअश्रूंना खळ नव्हता. तिची आई वारंवार हाका मारून तिला उठवत होती, असं का केली विचारत होती. मात्र संचिता तशीच निपचित होती. या हृदयद्रावक दृश्याने उपस्थितांचे डोळे भरून आले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by 👉 Viral News | Trending Reels 🔥 (@thelatestnewsupdates)

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in