• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan : अजूनही वेळ गेली नाही, माफी माग…, सलमान खानला एक्स – गर्लफ्रेंडचा मेसेज, नेमकं काय घडलं?

August 13, 2026 by admin Leave a Comment


Salman Khan : अभिनेता सलमान खान याला लॉरेंस बिश्नोई गँगकडून सतत धमक्यांचे फोन येत आहे. त्याच्या घराबाहेर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेंस बिश्नोईने घेतली. अभिनेत्याचा जीव धोक्यात असताना, भाईजानला एक्स-गर्लफ्रेंडचा मेसेज आला. जिने अभिनेत्याला माफी मागण्यास सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, सलमानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली हिने सलमानकडून माफीची मागणी केली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोमी अली हिने सलमान खान याला केलेल्या मेसेजबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये तिने अभिनेत्याला ईगो बाजूला ठेवून माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.

‘अजूनही वेळ गेली नाही, माफी माग…,’

निधि वासंदानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत सोमी अली हिला विचारण्यात आलं, ‘सलमान खान याच्या समोर बसून बोलण्याची वेळ आली तर काय बोलशील?’, यावर सोमी म्हणाली, ‘सलमान याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.’ सोमीने असा देखील दावा केला की, ‘मी सलमानला मेसेज केला आहे. माझ्याकडे त्याचा प्रायव्हेट नंबर आहे. मी त्याला म्हणाली, अजुनही वेळ गेलेली नाही, तू बिश्नोई मंदिरात जाऊन माफी माग आणि ज्या महिलांसोबत तू वाईट वागला आहेस, त्याची देखील माफी माग… स्वतःचा ईगो मागे सोड…’, असं देखील सोमी म्हणाली.

सलमान करतोय धमक्यांचा सामना 

गेल्या अनेक महिन्यांपासून सलमान खान यालालॉरेंस बिश्नोई गँगकडून सतत धमक्यांचे फोन येत आहे. दहशत निर्माण करण्यासाठी गँगने अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार देखील केला. त्यानंतर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांना देखील अनेकदा धमक्या मिळलया आहे.

सलमान खान आणि सोमी अली खान यांचं रिलेशनलशिप

समोर येत असलेल्या माहितीनुसार, 1990 च्या दशकात सलमान खान आणि सोमी अली यांच्यातील संबंधांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांच्यातील नाते संपल्यापासून, सोमीने सलमान खानवर मानसिक आणि शारीरिक छळाचे वारंवार आरोप केले आहेत. समोर  येत असलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आयुष्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची एन्ट्री झाल्यानंतर सोमीसोबत अभिनेत्याने ब्रेकअप केलं.

पण सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. ऐश्वर्या हिने देखील सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले. प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहोचलं. अशात सलमान  खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in