
टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. शुबमन गिल या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. हा सामना न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर इथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने माजी फिरकीपटू साईराज बहुतुले यांना मोठी जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयने साईराज बहुतुले यांची टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंग कोचपदी नियुक्ती केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
साईराज बहुतुले आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात पंजाब किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये होते. साईराज यांच्यावर पंजाब किंग्सच्या स्पिन बॉलिंग कोचपदाची जबाबदारी होती. तसेच साईराज त्याआधी 2018 ते 2021 या दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. त्यानंतर साईराज काही काळ एनसीएसोबत होते. राहुल द्रविड टीम इंडियाचे हेड कोच असताना साईराज यांनी काही मालिकांमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर साईराज 2025 साली पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्ससह जोडले गेले होते.
साईराज बहुतुले यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
साईराज बहुतुले यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही 7 वर्षांची राहिली. मात्र त्यांना या दरम्यान तुलनेत फार संधी मिळाली नाही. साईराज यांनी भारतासाठी 1997 ते 2003 दरम्यान एकूण 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. साईराज यांनी 2 कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र साईराज यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी त्यांची छाप सोडली.
साईराज यांची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
साईराज यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 20 वर्ष योगदान दिलं. साईराज यांनी या दरम्यान 188 फर्स्ट क्लास सामन्यांदरम्यान 630 विकेट्स मिळवल्या. तसेच साईराज यांनी 143 लिस्ट ए सामन्यांमध्ये 197 विकेट्स मिळवल्या.
साईराज बहुतुले यांची टीम इंडियात एन्ट्री
News
BCCI appoints Sairaj Bahutule as India’s Spin Bowling Coach.
More Details
| #TeamIndiahttps://t.co/DYgHNIX7E5
— BCCI (@BCCI) June 2, 2026
टीम इंडिया आणि कोचिंग स्टाफ
दरम्यान साईराज यांच्यामुळे क्रिकेट टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ परिपूर्ण होणार आहे. याआधी टीम इंडियाकडे स्पिन बॉलिंग कोच नव्हता. सध्या सितांशु कोटक हे टीम इंडियाचे बॅटिंग कोच आहे. मॉर्ने मॉर्कल याच्याकडे वेगवान गोंलदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. टी दिलीप हे फिल्डिंग कोच आहेत. रायन टेन डेश्काटे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.
News
|
Leave a Reply