• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Russia-India : Su-57E फायटर जेटच्या बाबतीत रशियाकडून भारताला गेम चेंजर ऑफर, नक्कीच पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकेल

July 1, 2026 by admin Leave a Comment


रशिया सातत्याने भारताला Su-57E स्टेल्थ फायटर विमानाची ऑफर देत आहे. पण भारताचं स्वत:च पाचव्या पिढीचं AMCA फायटर विमान विकसित करतोय. त्यामुळे भारताने रशियाच्या ऑफरमध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाही. आता रशियाने पुन्हा एकदा भारताला Su-57E स्टेल्थ फायटर विमानाबद्दल जबरदस्त ऑफर दिली आहे. संरक्षण तज्ञांनुसार या ऑफरमुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील सैन्य शक्ती, संरक्षण उद्योग आणि पाचव्या पिढीच्या फायटर विमानांच्या स्पर्धेवर मोठा परिणाम होईल. रशियाकडून फायटर विमानं खरेदी करण्यापर्यंतच हा विषय मर्यादीत नाही, तर रशियाने भारताला अत्याधुनिक एयरोस्पेस टेक्नोलॉजी देण्याची तयारी दाखवली आहे. रशियाने अशी ऑफर आतापर्यंत दुसऱ्या कुठल्याही देशाला दिलेला नाही. नव्या प्रस्तावानुसार, टेक्नोलॉजी सहकार्यावर कुठल्याही प्रकारच्या अटी नसतील.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरम 2026 मध्ये स्पष्ट केलं की, रशिया भारतासोबत मिळून Su-57E प्लेटफॉर्मचा संयुक्त विकास करण्यास आणि अमर्याद सहकार्य करण्यास तयार आहे. पुतिन यांच्या या वक्तव्याकडे एक मोठा जागतिक रणनितीक संदेश म्हणून पाहिलं जात आहे.

त्या दृष्टीने रशियाची ही ऑफर फायद्याची

रिपोर्टनुसार रशिया भारताला 36 ते 60 पूर्णपणे तयार असलेली Su-57E स्टेल्थ फायटर विमानं लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यायला तयार आहे. यामुळे भारताचं स्वदेशी बनावटीचं AMCA फायटर विमानं तयार होण्याआधीच पाचव्या पिढीची फायटर जेट्स मिळतील. चीनकडने पाचव्या पिढीची J-20 विमानं आधीपासूनच उपलब्ध आहेत. चीनकडून पाकिस्तानला J-35 स्टेल्थ फायटर विमान्ं दिली जाऊ शकतात. या दोन्ही देशांसोबत भारताचं विळ्या-भोपळ्याच नातं आहे. त्यामुळे भारतीय एअरफोर्सला लवकरात लवकर पाचव्या पिढीची विमानं मिळणं गरजेच आहे. त्या दृष्टीने रशियाची ही ऑफर फायद्याची आहे.

HAL च्या नाशिक प्लांटची पाहणी

रशियाचा हा प्रस्ताव आत्मनिर्भर भारत मोहिमेला सुसंगत आहे. रशियाने भारताला लायसन्स आधारित उत्पादन, सिस्टिम इंटीग्रेशन आणि स्थानिक उत्पादनाचा प्रस्ताव दिला आहे. रशियाच्या टेक्निकल टीमने आधी HAL च्या नाशिक प्लांटची पाहणी केली आहे. तिथे Su-30MKI चं उत्पादन होतं. रशिया भारताला Su-57E ला लागणारी रडार सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, मिशन सॉफ्टवेयर आणि शस्त्रास्त्रांसारखी महत्वाची टेक्नोलॉजी द्यायला तयार आहे. यामुळे भारताला संरक्षण तंत्रज्ञान मिळेल. देशांतर्गत फायटर विमान निर्मिती प्रकल्पाला गती मिळेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in