• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rudram II : सुखोई-30 मधून शूट होताच थेट टार्गेट उद्धवस्त, शत्रुला आंधळं करणाऱ्या मिसाइल टेस्टमध्ये भारताला महत्वपूर्ण यश

June 5, 2026 by admin Leave a Comment


संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि इंडियन एअर फोर्सने नुकतीच रुद्रम-II मिसाइलची यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ ही चाचणी घेण्यात आली. फायटर जेट सुखोई 30 MKI मधून रुद्रम-II डागण्यात आलं. चाचणी दरम्यान मिसाइलने निश्चित केलेल्या टार्गेटचा अचूकतेने लक्ष्यभेद केला. रुद्रम-II च्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या मिसाइल भांडारात अजून एका अत्याधुनिक स्वदेशी मिसाइलचा समावेश झाला आहे. परीक्षण चाचणीत मिसाइलने ठरवलेले सर्व निकष पूर्ण केले, असं डीआरडीओने सांगितलं. चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज वरुन मिसाइलच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आलं. त्यासाठी रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टिम आणि समुद्रातील एक जहाजाची मदत घेण्यात आली. आकडे एकत्र केल्यानंतर मिसाइलने ठरवलेलं लक्ष्य अचूकतेने भेदल्याचं स्पष्ट झालं आहे.

रुद्रम-II हवेतून जमिनीवरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेणारी मिसाइल आहे. शत्रुची एअर डिफेन्स सिस्टिम आणि जमिनीवरील ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी हे मिसाइल विकसित करण्यात आलं आहे. सॉलिड फ्यूलवर चालणारी ही मिसाइल असून फायटर जेटमधून हे मिसाइल लॉन्च करता येतं. या मिसाइलची दोन वेगवेगळी वर्जन आहेत. एक अँटी-रेडिएशन मिसाइल आहे, शत्रूच्या रडारमधून जे सिग्नल येतात ते ट्रॅक करुन हल्ला करण्यासाठी खास हे मिसाइल बनवलं आहे. रडार म्हणजे डोळे, ज्यावर प्रत्येक हवाई हालचाल दिसते. शत्रुचं रडार उडवणं म्हणजे आंधळं करण्यासारखं आहे. दुसरं वर्जन जमिनीवरील लक्ष्यभेद करणासाठी बनवलं आहे.

रुद्रम-II ची रेंज किती?

रिपोर्टनुसार, रुद्रम-II ची रेंज जवळपास 300 किलोमीटर आहे. 5.5 मॅक स्पीडने हे मिसाइल उड्डाण करतं. म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा कित्येकपट जास्त वेग झाला. हे मिसाइल जवळपास 200 किलो पेलोड वाहून नेऊ शकतं, म्हणजे स्फोटकं. ज्या जागेवर हे मिसाइल हल्ला करेल, तिथलं चित्र खूप भयावह असेल. रुद्रम-II चं वैशिष्ट्य म्हणजे हे मिसाइल शत्रूचं रडार आणि रेडियो फ्रीक्वेंसी सिग्नल ओळखू शकतं. शत्रूचं रडार, एअर डिफेन्स सिस्टिमचं सुरक्षा कवच भेदणं या सिस्टिममुळे शक्य आहे.

रुद्रम फॅमिलीमधील भविष्यातील मिसाइल्स 

रुद्रम-II रुद्रम मिसाइल कुटुंबाचा भाग आहे. याआधी रुद्रम-II ची चाचणी 2020 साली केली होती. अँटी रेडिएशन रुद्रम-I ची रेंज थोडी कमी आहे. रुद्रम-II आणि भविष्यात रुद्रम-III ला लांब पल्ल्याचं एअर लॉन्च बॅलेस्टिक मिसाइल म्हणून विकसित केलं जात आहे. रुद्रम-III ची मारक क्षमता 600 किलोमीटर पेक्षा जास्त असू शकते. त्याशिवाय रुद्रम-IV वर सुद्धा काम चालू आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…
  • एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…
  • अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट
  • कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…
  • IRE vs IND: आयर्लंड दौऱ्यात इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीचं टी20 पदार्पण असेल खास! जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in