• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन

July 18, 2026 by admin Leave a Comment

येत्या रविवारी, 19 जुलै रोजी भारताचा अव्वल खेळाडून, हिटमॅन अर्थात रोहित शर्मा (Rohit Sharma)  हा वनडेमधला त्याचा अखेरचा सामना खेळणार अशा बातम्या कालपासून फिरत असून त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रोहितच्या रिटायरमेंटचे वृत्त ऐकून अनेकजण हळहळले. मात्र आता या प्रकरणात मोठा यू-टर्न आल्याचे समजते. रोहित लॉर्डसमध्ये अखेरचा सामना खेळून निवृत्ती घेणार नसल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयकडूनच याबद्दल मोठ विधान करण्यात आलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी या विषयावर मौन सोडलं आहे. रोहितच्या भविष्याबद्दल, ज्या बातम्या सध्या येत आहेत, त्या पूर्णपणे चुकीच्या आहे, असं सैकिया म्हणाले. लॉर्ड्सवर रोहित अखेरचा सामना खेळणार असल्याबद्दल कोणतंही बोलणं झालं नसल्याचं सैकिया यांनी स्पष्ट केलं.

बीसीसीआयने अखेर सोडलं मौन

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी रोहित शर्माबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं. “रोहित हा भारतीय वनडे टीमचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो संघाच्या रणनीतीचा भाग असेल, तोपर्यंत तो देशासाठी खेळत राहील. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना हा त्याचा अखेरचा सामना नसेल” असं ते म्हणाले.

निवृत्तीस तयार नाही रोहित

रोहित शर्मा निवृत्त होत नाहीये असं जरी बीसीसीआयच्या (BCCI) सचिवांनी स्पष्ट केलं असलं तरी दुसरीकडे मात्र निवड समितीचे सदस्य, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात निवृत्तीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. या वृत्तांनुसार, रोहित शर्मा निवृत्ती घेण्यास तयार नाही – याचाच अर्थअसा की , त्याच्या मनात सध्या निवृत्तीचा विचार नाही. 2027 सालचा वर्ल्डकप खेळण्याची त्याची इच्छा आहे. रोहितने यापूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली होती आणि आता देवजित सैकिया यांनीही यासंदर्भात निवेदन दिलं आहे.

बातमी लीक झाल्याने बीसीसीआ नाराज

दरम्यान, रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतची माहिती बाहेर फुटल्यामुळे बीसीसीआय (BCCI) अत्यंत नाराज असल्याचेही वृत्त आहे. निवड समितीच्या सदस्यांनी या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांसमोर कोणतेही विधान करू नये अशा सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत. 19 जुलै रोजी लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर, रोहित शर्माला वनडे वर्लडकपमध्ये संधी दिली जाणार नाही आणि त्याची भारतीय संघात निवड होणार नाही, असं निवड समितीने त्याला कळवलं होतं, असा दावा केला जात होता. मात्र, बीसीसीआयच्या सचिवांनी केलेल्या अलीकडील विधानामुळे या प्रकरणात अचानक मोठी कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे रोहितच्या रिटायरमेंटबद्दलचं गूढ आणखी वाढलं आहे.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in